Sonu Nigam : सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर केला गैरवर्तनाचा आरोप
Sonu Nigam : सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
Sonu Nigam : पद्मश्री सोनू निगम (Sonu Nigam) हा देशातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच एक घटना घडली आहे. आता सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
सोनूच्या एका सूत्राने स्पष्ट केले आहे की, सोनूला इक्बाल सिंह चहल यांच्याकडून एक पत्र आले होते. या पत्रात त्यांनी त्यांचा चुलत भाऊ राजिंदरच्या मार्फत परदेशात एका मैफिलीत गाणं सादर करण्याची विनंती केली होती. पण या पत्रातील राजिंदरने वापरलेली भाषा ही अपमानास्पद आहे. त्यामुळेच सोनू निगमने इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
सोनू निगमकडे राजिंदरच्या अश्लील संदेशांचा ऑडिओ आणि स्क्रीनशॉट देखील आहे. राजिंदर हे इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत मुंबईतच राहतात. त्यामुळे सोनूने या प्रकरणात दखल घेण्याचे ठरवले आहे. जेणेकरून असे पुन्हा होऊ नये.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यात सोनू निगमला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोनूने त्याच्या आईला समर्पित केला होता. तसेच त्याने भारत सरकारचेदेखील आभार मानले होते. सोनू निगम म्हणाला होता,"25 जानेवारी हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खास होता. 'पद्मश्री' पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मी भारत सरकारचा आभारी आहे. माझी आई शोभा निगम आणि माझे वडील आगम कुमार निगम यांचेही मी आभार मानू इच्छितो. खरं तर हा पुरस्कार मला माझ्या आईला समर्पित करायचा आहे. आज ती इथे असती तर खूप रडली असती. माझ्या प्रवासाचा एक भाग असलेल्या माझ्या कुटुंबियांचे मी आभार मानतो".
संबंधित बातम्या
Jhund Trailer : बिग बींचा स्वॅग, आकाशचा लफडा.. 'झुंड'चा ट्रेलर लॉंच
Kangana Ranaut , Alia Bhatt : गंगूबाई काठियावाडीबद्दल कंगनाने केलेल्या कमेंटला आलियाचं सडेतोड उत्तर; म्हणाली...
Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha