(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचर विरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Bollywood : मुंबई पोलिसांनी बॉलिवूड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Bollywood : मुंबईतील जुहू पोलिसांनी बॉलिवूड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचरसह (Archana Kochhar) दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्चनाची मेहुणी प्रिया जेटली यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एबीपी न्यूजकडे उपलब्ध एफआयआर कॉपीनुसार, प्रिया जेटली यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की,"28 एप्रिल रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास माझा भाऊ राजीव कोचर जुहू येथील घरात आला जे आमच्या वडिलांनी मला दिले होते. त्याने घरातल्या वस्तू आणायला सुरुवात केली त्यानंतर मी हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसले.
राजीवने मला येथून निघून जाण्यास सांगितले, त्यावर मी म्हणाले की हे घर माझे आहे, हे घर मला माझ्या वडिलांनी दिले आहे. त्यानंतर राजीवने पत्नी अर्चना कोचरला फोन केला आणि मी (प्रिया) येथे असल्याचे सांगितले, काही वेळाने अर्चनाच्या नगमा नावाच्या बाऊन्सरला घरी बोलावले".
प्रियाने पुढे दावा केला की,“नगमाने माझा हात धरला आणि येथून निघून जा, असे सांगितले, त्यानंतर जेव्हा मी बाहेर जाण्यास नकार दिला आणि सोफा धरून बसले तेव्हा नगमाने मला मारहाण केली आणि माझे केस ओढले, इतकेच नाही तर तिने माझा गाऊन आणि ओढणी खेचली. यात गाऊन फाटला, तरीही मी सोफा धरून बसले होते आणि ती मला मारत होती. दरम्यान राजीव प्रियाला बाहेर काढण्यासाठी जोरात ओरडत होता. यानंतर माझा वॉचमन गोविंद तेथे आला तेव्हा राजीवने त्याला जाण्यास सांगितले आणि दरवाजा आतून लॉक केला, त्यानंतर मी 112 वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली आणि पोलिस आल्यावर राजीवने दरवाजा उघडला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली".
प्रियाच्या तक्रारीच्या आधारे, जुहू पोलिसांनी अर्चना कोचर, राजीव कोचर आणि नगमा यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 354, 341, 325 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
कोण आहे अर्चना कोचर? (Who is Archana Kochhar)
अर्चना कोचर लोकप्रिय भारतीय फॅशन डिझायनर आहे. जागतिक पातळीवर आपल्या कामाने ती ओळखली जाते. लॅक्मे फॅशन वीक, इंडिया फॅशन वीक आणि न्यूयॉर्क फॅशन वीक यांसारख्या कार्यक्रमांमध्ये कोचरच्या डिझाइन्सचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या मोहिमेचादेखील ती भाग आहे.
संबंधित बातम्या