एक्स्प्लोर

Anil Kapoor : 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास झाला तयार, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

Anil Kapoor : लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होता. एका अभिनेत्रीसोबतही अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं होतं. या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास तयार झालेला असे म्हटले जाते.

Anil Kapoor : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) गेल्या पाच दशकांपासून बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवत आहे. अनिल कपूरने 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनयासह अनिल कपूर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि अफेअर्समुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल कपूर यांनी आपल्या आयुष्यात अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण एका अभिनेत्रीसोबत अनिल कपूरचं नाव जोडलं गेलं होतं. या अभिनेत्रीचं नाव किमी काटकर (Kimi Katkar) असं आहे. लग्न झालेलं असूनही अनिल कपूर किमी काटकरच्या प्रेमात पडला होता. या अभिनेत्रीसोबत संसार थाटण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास तयार झालेला असं म्हटलं जातं. 

अनिल कपूर किमीवर झालेला फिदा

पाच वर्षांच्या रिलेशननंतर अनिल कपूर सुनीतासोबत लग्नबंधनात अडकला. 1984 मध्ये अनिल आणि सुनीता यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या एक वर्षानंतर अनिल आणि सुनीताने सोनमला जन्म दिला. तर 1987 मध्ये त्यांना दुसरी मुलगी झाली. रिया असं तिचं नाव आहे. पत्नी आणि दोन मुलांचा वडील असूनही अनिल कपूर सहकलाकार किमी काटकरच्या प्रेमात पडला. दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली. 

मीडिया रिपोर्टनुसार, अनिल कपूरला किमी प्रचंड आवडायची. त्यामुळे अनेक निर्मात्यांकडे ते तिचं नाव सुचवायचे. ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीनदेखील दोघे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. अनिल कपूर आणि किमी काटकर यांनी 'काला बाजार','आग से खेलेंगे','हमला' आणि 'सोने पे सुहागा' सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. 

अनिल कपूर यांचा पत्नी सुनीतावर प्रचंड विश्वास होता. पण सततच्या अफवांमुळे तिचा स्वत:वरचा ताबा सुटला. अनिल आणि किमीला एकत्र पाहून सुनीताला राग अनावर झाला. त्यानंतर तिने अनिल कपूरला दम दिला. सुनीता मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेली. पुढे अनिल कपूर यांनी सुनीताला चांगलच मनवलं. त्यानंतर सुनीता पुन्हा सासरी आली. पुढे अनिल कपूर यांनी किमीला दूर केलं.

कोण आहेत अनिल कपूर? (Who is Anil Kapoor)

अनिल कपूर हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 40 वर्षांपेक्षा अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॅकग्राऊंड डान्सर ते हिरो असा अनिल कपूर यांचा प्रवास होता. चेंबुरच्या चाळीत ते लहानाचे मोठे झाले आहेत. अनिल कपूर आज बॉलिवूडचा लोकप्रिय सुपरस्टार आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Anil Kapoor :  मिथुनने नकार दिलेल्या चित्रपटाने अनिल कपूरला एका रात्रीत केले सुपरस्टार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget