एक्स्प्लोर

BTS Jungkook: बीटीएसच्या जंगकूकने इन्स्टाग्राम अकाऊंट केलं डिलीट; सांगितलं 'हे' कारण

जंगकूकनं (Jungkook) त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे.इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यामागील कारण देखील त्यानं सांगितलं.

BTS Jungkook: बीटीएस (BTS) या बँडच्या सर्वात तरुण सदस्य असणाऱ्या जंगकूकने (Jungkook) त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे. Weverse या कम्युनिटी फोरमच्या माध्यमातून जंगकूकने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यामागील कारण देखील सांगितलं. त्याने सांगितलं ईकी, "मी इन्स्टाग्राम वापरणं बंद केलं आहे. ते हॅक झालेलं नाही. मी इन्स्टाग्रामचा वापर करत नव्हतो. म्हणून मी ते डिलीट केलं. काळजी करु नका."

जंगकूकने एका पोस्टमध्ये इन्स्टाग्रामबद्दल लिहिलं होतं, "मी ते वापरत नाही, मी काय करु शकतो? मी त्याऐवजी Weverse वर कधीतरी लाइव्ह येईल. मी ते अॅप देखील डिलीट केलं आहे आणि मी कदाचित भविष्यात देखील ते वापरणार नाही! मी तुम्हा सर्वांना हे आधीच कळवत आहे."

जंगकूकनं इन्स्टाग्राम डिलीट केल्यानंतर त्याच्या एका चाहत्याने ट्विटरवर पोस्ट केली, "जेके (जंगकूक) खरोखर इन्स्टाग्राम वापरत नसेल. मला त्याचे Weverse वरील लाईव्ह आवडते. त्या लाईव्हमध्ये मला त्याच्यासोबत कनेक्ट झाल्यासारखं वाटतं." तर एका नेटकऱ्याने ट्वीट केलं आहे की, "मी दुःखी आहे. परंतु, मी त्याच्यासाठी आनंदी आहे कारण तो असा व्यक्ती आहे ज्याला त्याला काय हवे आहे हे माहित आहे."

इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्यानंतर Weverse वरुन जंगकूकने लाईव्ह सेशन केलं. या सेशनमध्ये तो म्हणाला की, "मी घरी होतो. मला कंटाळा आला म्हणून मी थोड्यावेळ हे लाईव्ह सुरु केलं. ओह जे होम देखील इथे आहे. जिमीन ह्युंग पण इथे आहे. सर्व मेंबर्स पाहून मला आनंद झाला."

कोरियन बँड (K-pop Band) बीटीएस मधील सदस्य जंगकूकने फिफाच्या ग्रँड ओपनिंगला खास परफॉर्मन्स केला होता. फिफा विश्वचषकाच्या ओपनिंगला परफॉर्म करण्यासाठी जंगकूक हा कतारला पोहचला होता. त्यानंतर ट्वीटरवर #WelcomeToQatarJungkook हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. 

जाणून घ्या BTS बँड ग्रुपबाबत

BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप (Kpop Boy Band) आहे. या बँडमध्ये सात सदस्य आहेत. त्यांची नावं किम सोकजिन (Jin Aka Kim Seok-Jin), मिन युंगी (Suga Aka Min Yoongi), जंग होसोक (J Hope Aka Jung Ho-seok), किम नामजून (RM Aka Kim Nam-Joon), पार्क जीमिन (Jimin Aka Park Jimin), किम तेह्युंग (V - Kim Tae-Hyung), आणि जीओन जंगकूक (Jungkook Aka Jeon Jung-kook) अशी आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

BTS J-Hope : Jin नंतर आता बीटीएसचा दुसरा सदस्य होणार सैन्यात भरती, J-Hope नं चाहत्यांना दिली मोठी बातमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget