BTS J-Hope : Jin नंतर आता बीटीएसचा दुसरा सदस्य होणार सैन्यात भरती, J-Hope नं चाहत्यांना दिली मोठी बातमी
J-Hope : बीटीएस (BTS) या कोरियन ब्रॅंडचा सदस्य जे - होप सैन्यात भरती होणार आहे.
J-Hope : बीटीएस (Bangtan Sonyeondan) या जगप्रसिद्ध कोरियन ब्रॅंडचा (Korean Brand) सदस्य जे - होप (J-Hope) सैन्यात भरती होणार आहे. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. लाईव्ह सेशनदरम्यान तो म्हणाला की,"मला माझा सहकारी जिनने सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला होता. आता लवकरच मी चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे.
जे-होप एका वर्षापासून करतोय सैन्यात भरती होण्याची तयारी
जे-होप म्हणाला,"सैन्यात भरती होण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. बीटीएसचा (BTS) जिन ह्युंग सैन्यात भरती झाल्यापासून माझ्या डोक्यातदेखील सैन्यात भरती होण्याचा विचार सुरू झाला. त्यानंतर गेल्या एका वर्षापासून मी सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहे. आता मी 30 वर्षांचा झाला असून अनिवार्य लष्करी सेवेत काम करण्यात सज्ज आहे".
(armys were being sad in the cats)
— Sel⁷ (@BTStranslation_) February 26, 2023
🐿️ kyaaaaaaa~ [cute sound effect], it's not a big deal I'll go and come back quickly [cutely]pic.twitter.com/97vlZht4wH
सैन्यात भरती होण्यापूर्वी जे-होप चाहत्यांशी संवाद साधणार
सैन्यात भरती होण्यापूर्वी जे-होप सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणार आहे. याबद्दल बोलताना जे-होप म्हणाला,"सैन्यात भरती होणं गरजेचं आहेत. पण चाहत्यांपासून लांब जात असल्याने मला वैयक्तिकरित्या खूप वाईट वाटत आहे. माझा पुढचा अल्बम 'जिमीन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमच्याप्रमाणे मीदेखील या अल्बची आतुरतेने वाट पाहत आहे".
जे-होप सैन्यात भरती का होणार?
दक्षिण कोरियातील शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पुरुषांना वयाच्या तिशीपर्यंत सुमारे दोन वर्ष राष्ट्रीय सेवेत काम करणं बंधनकारक असतं. 18 ते 28 वयोगटातील तरुणांना लष्करात 21 महिने, नौदलात 23 महिने किंवा हवाई दलात 24 महिने यापैकी एकाची निवड करावी लागते. तसेच पोलीस, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा या सरकारी विभागात काम करण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर असतो. आता जे-होप 30 वर्षांचा झाला असून तो आता सैन्यात भरती होणार आहे.
जे-होपबद्दल जाणून घ्या...
जे-होपचा जन्म 18 फेब्रुवारी 1994 रोजी दक्षिण कोरियात (South Korea) झाला. लहानपणापासून त्याला नृत्याची आवड होती. पुढे संगीताची गोडी लागली. संगीतक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जे-होपला संघर्षाचा सामना करावा लागला आहे. आज जे-होपचा मोठा चाहतावर्ग असून जगभर तो लोकप्रिय आहे.
संबंधित बातम्या