Brahmastra Box Office Collection Day 5 : ब्रह्मास्त्रची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन
पाचव्या दिवशी देखील ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
Brahmastra Box Office Collection Day 5 : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील VFX ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. पाचव्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटाचे कलेक्शन
पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (13 सप्टेंबर) या चित्रपटानं जळपास 12.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 16 कोटींची कमाई केली आहे.रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटानं 45 कोटी कमावले. पाच दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 152.50 कोटींची कमाई केली आहे.
ब्रह्मास्त्रचा दुसरा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीस
चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी बोलताना अयान मुखर्जी म्हणाला, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दुसरा (Brahmastra 2) ) भाग डिसेंबर 2025पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. मात्र, यावेळी अयानने नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. अयान म्हणाला की, पुढच्या 3 वर्षांत हा चित्रपट बनवून प्रदर्शित करायचा, हे आमचे टार्गेट आहे. अर्थात हे टार्गेट जुळवणे मेकर्ससाठी कठीण जाईल. कारण या चित्रपटाचा पहिला भाग बनवायलाच खूप वेळ लागला. मात्र, आता असे चित्रपट कसे बनतात हे जाणून घेतले.
अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे.
वाचा सविस्तर बातमी :