एक्स्प्लोर
Advertisement
Gully Boy | रणवीर, आलियाचा गली बॉय ऑस्करवारीला
चित्रपटातील रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने 200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्टची तुफान केमिस्ट्री असलेल्या गली बॉयला आता ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री मिळाली आहे. अंधाधून, सुपर डिलक्स आणि आर्टिकल 15 या शर्यतीत असलेल्या सिनेमांना मागे टाकत गली बॉयने बाजी मारली आहे.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी भारताकडून ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या 26 वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे.
चित्रपटातील रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने 200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. झोया अख्तरचा भाऊ फरहान अख्तरने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. फरहान या चित्रपटाचा निर्मातासुद्धा आहे. 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गली बॉय या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे, असं सांगत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही माझा सर्वाधिक आवडता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. झोया ही माझी आवडती दिग्दर्शिका आहे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.#GullyBoy has been selected as India’s official entry to the 92nd Oscar Awards. #apnatimeaayega Thank you to the film federation and congratulations #Zoya @kagtireema @ritesh_sid @RanveerOfficial @aliaa08 @SiddhantChturvD @kalkikanmani & cast, crew and hip hop crew. 🕺🏻 pic.twitter.com/Eyg02iETmG
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) September 21, 2019
My absolute favourite film of the year is the official Indian entry for the OSCARS!!!! #GullyBoy all the way! Zoya Akhtar is my favourite Indian filmmaker! Well done boys @FarOutAkhtar @ritesh_sid get the gold statue home!!! So excited !! @aliaa08 @RanveerOfficial and the team!
— Karan Johar (@karanjohar) September 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement