Black Panther 2 Trailer : अॅक्शनचा तडका अन् रोमांच; मार्वल स्टुडिओजच्या बहुचर्चित 'ब्लॅक पॅंथर 2'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Black Panther 2 : मार्वल स्टुडिओजच्या बहुचर्चित 'ब्लॅक पॅंथर' या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Black Panther 2 Trailer Released : मार्वल स्टुडिओजच्या (Marvel Studios) सिनेमांची भारतीय सिनेप्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ दिसून येते. सुपरहिरोंच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच मार्वल स्टुडिओजने त्यांच्या आगामी 'ब्लॅक पॅंथर' या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा (Black Panther 2) ट्रेलर रिलीज झाला आहे.
'ब्लॅक पॅंथर 2'चा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. चॅडविक बॉसमॅनच्या निधनानंतर 'ब्लॅक पॅंथर 2' संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अशातच इंडिया मार्वल या युट्यूब चॅनलवर 'ब्लॅक पॅंथर 2'चा दिमाखदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
View this post on Instagram
'ब्लॅक पॅंथर 2'च्या ट्रेलरमध्ये काय आहे?
'ब्लॅक पॅंथर 2'चा ट्रेलर 2 मिनिट 10 सेकंदचा आहे. ट्रेलर सुरुवातील प्रेक्षकांना भावनिक करतो. पण ट्रेलर जस-जसा पुढे जातो तसं ट्रेलरमधील अॅक्शनचा तडका आणि रोमांच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. 'ब्लॅक पॅंथर 2'चा ट्रेलर खूपच दिमाखदार आहे.
चॅडविक बॉसमॅनच्या जागी ब्लॅक पॅंथरच्या भूमिकेत तिची बहिण शुरी म्हणजेच हॉलिवूड अभिनेत्री लेटशिया राईट दिसून येणार आहे. 'ब्लॅक पॅंथर'चा पहिला भाग 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'ब्लॅक पॅंथर' हा एक अमेरिकन सुपरहिरोचा सिनेमा आहे. जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पॅंथरच्या पात्रावर आधिरत आहे.
'ब्लॅक पॅंथर 2' कधी होणार रिलीज?
'ब्लॅक पॅंथर 2'चा ट्रेलर रिलीज होण्यासोबत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. 'ब्लॅक पॅंथर 2' हा सिनेमा 11 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भारतात हिंदीसह हा सिनेमा इंग्लिश, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलर पाहा :