एक्स्प्लोर
महानायकाच्या 75 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची 10 महिने आधीच तयारी सुरु
नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा यंदा 75 वा वाढदिवस आहे. खरंतर वाढदिवस ऑक्टोबरमध्ये आहे म्हणजे अजून 10 महिने बाकी आहेत. मात्र, या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त बच्चन कुटुंब आणि मित्र परिवाराने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील सर्व दिग्गज गायक बिग बींच्या सिनेमांमधील गाण्यांच्या माध्यमातून त्यांना सलाम करणार आहेत.
अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, रणवीर सिंह यांसारख्या अभिनेत्यांसह अवघं बॉलिवूड या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या काय या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्यासाठी काहीतरी वेगळं करणार असल्याचं बोललं जात आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसांचं हे भव्य-दिव्य सेलिब्रेशन टीव्हीवरुन चाहत्यांसाठीही टेलिकास्ट केला जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा 70 वा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या चॅनेल्सना मुलाखती दिल्या होत्या आणि संध्याकाळी दादासाहेब फाळके चित्रनगरीत बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित पार पडला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
रायगड
जळगाव
व्यापार-उद्योग
Advertisement