Batman : बॉक्स ऑफिसवर 'द बॅटमॅन'ने घातला धुमाकूळ, 500 मिलियन डॉलरचा टप्पा पार
Batman : 'द बॅटमॅन' हा सिनेमा जगभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.
Batman : 'बॅटमॅन'चे (Batman) चाहते जगभर आहेत. 'द बॅटमॅन' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 'द बॅटमॅन'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 मिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे.
'द बॅटमॅन' हा 'जोकर' नंतरचा सर्वात मोठा हिट सिनेमा आहे. हा हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा आहे. या सिनेमात रॉबर्ट पॅटिनसन (Robert Pattinson) अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
'बॅटमॅन' सिनेमात रॉबर्ट पॅटिन्सन आणि जो क्रॅविट्झ यांच्यासह पॉल डॅनो, जेफरी राइट, जॉन टर्टुरो आणि पीटर सार्सगार्ड यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'द बॅटमॅन' सिनेमाचा चाहतावर्ग मोठा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
View this post on Instagram
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'द बॅटमॅन' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 4 मार्च 2022 ला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमात रॉबर्ट पॅटिनसन मुख्य भूमिकेत आहे.
संबंधित बातम्या
Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर कराल तर... , कंपनी आणणार नवीन फिचर
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?
Kapil Sharma बनला फूड डिलिव्हरी रायडर , चाहत्याने शेअर केलेल्या फोटोवर कपिल म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha