एक्स्प्लोर
Baipan Bhaari Deva: 'ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट...'; बाईपण भारी देवा चित्रपटाबाबत संजय मोने यांची खास पोस्ट
नुकतीच अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.
![Baipan Bhaari Deva: 'ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट...'; बाईपण भारी देवा चित्रपटाबाबत संजय मोने यांची खास पोस्ट Baipan Bhaari Deva actor sanjay mone special post about film Baipan Bhaari Deva: 'ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट...'; बाईपण भारी देवा चित्रपटाबाबत संजय मोने यांची खास पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/728bacae30b59104da476101a164a9e51688879199612259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Baipan Bhaari Deva, Sanjay Mone
Baipan Bhaari Deva: गेल्या काही दिवसांपासून बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण बाईपण भारी देवा या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतीच अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.
संजय मोने यांची पोस्ट
संजय मोने यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिलं, 'बाईपण भारी देवा-सध्या हा मराठी चित्रपट उत्कृष्ठ गर्दीत असंख्य चित्रपट गृहात सुरु आहे.माझी बायको सुकन्या कुलकर्णी आणि माझी मुलगी जुलिया (आईच्या तरुण वयातले एक दृष्य त्यात तिने साकारले आहे)त्यात काम करते आहे म्हणून मी तो पाहायला गेलो.'
संजय मोने यांनी या पोस्टमध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे कौतुक केलं आहे. त्यांनी केदार शिंदे यांच्याबाबत पोस्टमध्ये लिहिलं, 'आता दिग्दर्शक केदार शिंदे. तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे तरीही तो मला मनाने वागवतो याबद्दल त्याचे आभार.केदारच्या चित्रपटात गीतं ही नेहमीच एक ठळक वैशिष्टय ठरत आलेलं आहे.आणि असणारच कारण वारसा आहे.सरळ सोप्या आणि तरीही खास जागा असलेलं दिग्दर्शन त्याने केलं आहे.'
पुढे त्यांनी लिहिलं, 'सगळ्यात शेवटी नायक प्रधान चित्रपट व्यवस्थेत संपूर्ण नायिका प्रधान चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल निर्मात्यांचे आभार.अगदी जरूर जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. नाव जरी बाईपण भारी देवा असं असलं तरी पुरुषांनीही जरूर बघा १)सध्याची गर्दी आणि तिकिटांसाठी उडणारी झुंबड बघता एक दिवस सर्व कचे-या बंद ठेऊन नोकरदार आणि व्यावसायिक यांना चित्रपट बघायची सोय करावी. २)खरं तर ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता.पाहिल्यानंतर अनुभवायला मिळणारी शीतल झुळूक एप्रिल-मे-जून सुखावह करून गेला असता . पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन आणि निर्माता-दिग्दर्शक यांचे विशेष आभार.'
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)