एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : स्त्रीच्या हरवलेल्या क्षणांचा शोध 'बाईपण भारी देवा'

Baipan Bhaari Deva : सहा बहिणी आणि त्यांची काहीशी विखुरलेली, विस्कटलेली आयुष्य, त्यांच्यासमोरची आव्हानं, त्यात त्यांचं बहीण म्हणून पुसट झालेलं नातं आणि नंतर या नात्याची बसलेली घडी. 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) सिनेमाचा  हा प्रवास आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. नव्हे, त्या सहा बहिणींच्या आयुष्यातल्या त्यांच्या जगलेल्या आणि न जगलेल्या काही क्षणांमध्येही कुठेतरी आपल्याला आपल्या आयुष्याचा आरसा दिसतो.

सिनेमाच्या सुरुवातीला सहाही बहिणींची कॅरेक्टर एस्टॅबलिश झाली की, प्रत्येकाचं आयुष्य आपल्या समोर उलगडत जातं. त्या बहिणी असूनही त्यांच्या नात्यात कुठेतरी सैलावलेली वीण हीदेखील आपल्याला प्रेक्षक म्हणून सापडत जाते. त्याच वेळी मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धेचं निमित्त समोर येतं आणि काळाच्या ओघात अंतर निर्माण झालेल्या या बहिणी या मंगळागौरीच्या सरावाच्या निमित्ताने एकत्र येतात. त्या फक्त सरावासाठी एकत्र येतात असं नव्हे तर मनानेही एकमेकींशी पुन्हा बांधल्या जातात. त्यांच्या त्यांच्या आयुष्यात आव्हानांचे अनेक खड्डे असतात. त्या जेव्हा काहीशा डिसकनेक्ट झालेल्या असतात तेव्हा त्यांना या संकटांचा, आव्हानांचा सामना एकट्याने करायला लागतो. इथे मात्र त्या एकत्र आल्यावर  एकमेकांची दु:ख जगतात, या खड्ड्यांमधून बाहेर येण्यासाठी एकमेकींना हात देतात आणि त्यातून त्यांच्या आयुष्यात एकत्रित आनंद फुलतो.

सहा बहिणींपैकी कुणाचं ना कुणाचं तरी दुसरीशी काहीतरी बिनसलेलं असतं. त्याचीही कबुली आणि त्यावरची मलमपट्टी यादरम्यान होत जाते. दीपा परब, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते यांचा एकमेकींसोबतचा या ना त्या कारणाने आधी हरवलेला आणि मग गवसलेला ओलावा याचं चित्रण कमाल दाखवलंय. वंदना गुप्ते एका सीनमध्ये येऊन जेव्हा रोहिणी हट्टंगडींच्या मांडीवर डोकं ठेवून रडतात, तो क्षण मन गलबलून टाकणारा आहे. तिथे फार संवाद नाहीत, पण, तो सीन आपल्याशी त्यांचे लूक्स, त्यांचं जिवाच्या आकांताने रडणं, त्यांचे एक्सप्रेशन्स यांनी हा सीन इतका बोलतो की, मनाला आतमध्ये खोलवर परिणाम करुन जातो. या दोघींच्याही अभिनयाला इथे तुम्हाला सॅल्यूट करावाच लागेल. तसाच आणखी एक मनाला टच झालेला सीन, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा. शिल्पा नवलकरांनी सुचित्रा बांदेकरांचा हात घट्ट धरुन ठेवलेला असतो. तोच हा सीन. ज्यामध्ये डायरेक्टर केदार शिंदे बिटविन द लाईन्स सांगून जातात. दीपा परब-सुकन्या मोने यांचा कारमधला सीनही इमोशनली खूप टच होतो. तसंच दीपा परब यांचं मुलांच्या वाढदिवसाच्या वेळचं त्यांचं मनोगत.

'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील स्त्रिया मग ती आई असो, बहीण असो, बायको असो वा अगदी ऑफिसमधील महिला सहकारी असो, त्या किती मोठ्या कॅनव्हासवर लढत असतात. किती मोठ्या रेंजची आव्हानं पेलत असतात, हे पुरुष म्हणून आपल्याला अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे. नव्हे तितक्या डोळसपणे आपण ते पाहायला हवं, हे सांगणारा हा सिनेमा आहे. स्त्री तिच्यावर असलेल्या आई, बहीण, मुलगी, सून अशा विविध जबाबदाऱ्यांच्या पायऱ्यांवरुन पुढे जात असते. प्रत्येक पायरीवरची आव्हानं निराळी, तिचा सामना करत असताना तिची दमछाक होत असली ती नेटाने, धैर्याने त्याला तोंड देते. त्याच वेळी ती इतकी पुढे निघून जाते की, या नात्यांच्या गुंत्यात तिचं माणूस म्हणून जगणं मागे राहून जातं. त्या हरवलेल्या जगण्याचा शोध, काही सांडलेल्या क्षणांचं वेचणं म्हणजे हा सिनेमा आहे.

'बाईपण भारी देवा' हा सिनेमा स्त्रीप्रधान असला तरी पुरुषांनाही आरसा दाखवणारा आहे, विचार करायला लावणारा आहे. म्हणजे स्त्रियांना कोणत्याही नात्यात गृहित धरलं तिची घुसमट होऊ शकते, हे अधोरेखित करणारा हा सिनेमा तुम्हाला तुमच्या नियमित आयुष्यातल्या क्षणांमधूनच शिकवून जातो, अंतर्मुख करुन जातो. नाती जपताना आपल्या माणूस असण्यासोबतच दुसऱ्याचं माणूस असणं, त्याच्यावर असलेल्या नात्याच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली त्याच्यातला माणूस दबून जाणार नाही ना, किंवा दबला गेलाच तर त्याला बाहेर काढणं किती गरजेचं आहे, हेच हा सिनेमा आपल्याला दाखवून जातो.

आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्त्रीला किती तडजोडी करावी लागतात, त्या तडजोडी ती केवळ तडजोड म्हणून नव्हे, तर आयुष्याचा भाग म्हणून सहज स्वीकारते, मात्र त्याच वेळी तिचं जगणं हिरावलं गेल्यानं असणारी तिची अस्वस्थता याचंही दर्शन हा सिनेमा आपल्याला घडवतो आणि मनाला स्पर्शून जातो.

श्रीमंत नवरा, मध्यमवर्गीय नवरा, म्हातारपणाचा टप्पा या आपल्या आयुष्यातल्या घटकांचा पट हा सिनेमा उलगडून दाखवतो, 'उघड्या पुन्हा जहाल्या'  हे श्रीकांत ठाकरेंचं ग्रेट गाणं या बहिणींच्या आयुष्यातली वेदना, त्यांचं भोगणं अत्यंत परिणामकारकपणे पोहोचवतं. तसाच टायटल साँगचं चपखल प्लेसमेंट सिनेमाची गोडी खुलवतो.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने अशा अभिनयाच्या दादा बॅट्समननी तुफान बॅटिंग केलीय. त्याचवेळी सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरींचे रोलही कमाल झालेत. या सहा जणी जर सिनेमाच्या हिरोईन्स असतील तर, सिनेमाची कथा आणि संवाद हे सिनेमाचे हिरो आहेत, असं मला वाटतं.

नात्यांचे बंध केव्हा जगण्याची बंधनं होतात ते आपल्याला कळतही नाही, त्या बंधांचा धागा हा बंधनं न होता तो नात्यांची वीण घट्ट करणारा असायला हवा, याची जाणीव करुन देणारा हा सिनेमा. सिनेमाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातल्या स्त्री शक्तीला वंदन करुया आणि आपणही म्हणूया खरंच 'बाईपण भारी देवा'.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget