एक्स्प्लोर
Advertisement
अंडरटेकरची भेट, ते मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स !
मुंबई: 'बाहुबली 2' सिनेमा आज रिलीज झाला. कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर या सिनेमातून मिळणार आहे. त्यासाठी चाहत्यांनी तिकीटासाठी थिएटरबाहेर रांगा लावल्या आहेत.
बाहुबली आणि बाहुबली 2 या सिनेमातील अशा काही फॅक्टस आहेत, ज्या वाचून तुम्ही चकीत व्हाल.
- बाहुबली द बिगिनिंग सिनेमाने तब्बल 600 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली. खर्च वजा जाता निर्मात्यांना घसघशीत नफा पदरात पाडून घेतला असेल असं कोणालाही वाटू शकतं. पण हे खरं नाही. निर्माते म्हणतायत पहिल्या भागाच्या कमाईतून आमचा फक्त खर्च वसूल झालाय.
- बाहुबली सिनेमातल्या स्टंट सीनसाठी प्रभासने जबरदस्त मेहनत घेतली.बाहुबली सत्यात उतरवण्यासाठी जे जे शक्य होतं ते सारं त्यानं केलं. त्याच्याच एक भाग म्हणून तो WWE चॅम्पियन अंडरटेकरला भेटला. 2014 मध्ये अंडरटेकरसोबत झालेली भेट प्रभाससाठी खूप महत्वाची ठरली.
- महेंद्र बाहुबलीचा जो ऑरा आहे तो पहिल्यांदा प्रभासच्या देहबोलीतून व्यक्त होतो. त्यासाठी त्याला अपार कष्ट घ्यावे लागले. यात निर्मात्यांनी त्याला काहीही कमी पडू दिलं नाही. त्याच्या रोजच्या वर्कआऊटसाठीप्रभासच्या घरीच अद्यावत जीम उभारण्यात आली. या जीम उभारणीचा खर्च होता तब्बल दीड कोटी रुपये.
- प्रभासच्या या वर्काआऊटला जोड होती ती भरभक्कम आहाराची. दिवसातून तो 8 ते 10 वेळा तो जेवण करायचा.त्याचा नाश्ता ऐकूनतर तुम्ही चक्राऊन जाल. नाष्ट्यामध्ये प्रभास तब्बल 40 उकडलेली अंडी खायचा.
- बाहुबलीसाठी प्रभासने तब्बल 4 वर्ष झोकून देऊन काम केलंय. या 4 वर्षात प्रभासने इतर कोणताही सिनेमा स्वीकारला नाही. प्रभासच्या या निर्णयावर त्याच्या कुटुंबियांनी मित्रपरिवाराने नाराजी व्यक्त केली. पण प्रभासने कशाचीही पर्वा न करता ही रिस्क घेतली.बाहुबलीला मिळणारी प्रसिद्धी पाहता प्रभासचा निर्णय अगदी योग्य होता यात तीळमात्रही शंका नाही.
- रिलीजआधीच बाहुबली 2 ची कमाई 500 कोटींच्या घरात गेली आहे. ह्या सिनेमाचे हिंदी भाषेतील राईट्स करण जोहरने विकत घेतले आहेत. त्यासाठी त्याने 120 कोटी रुपये मोजलेत. तेलगू भाषेतील राईट्ससाठी निर्मात्यांना 130 कोटी रुपये मिळालेत. तामिळनाडूत 47 कोटी रुपये तर कर्नाटकमध्ये 45 कोटी रुपयांचा गल्ला बाहुबलीने रिलीजआधीच जमवलाय. हे आकडे फक्त हक्कविक्रीचे आहेत जेव्हा बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे आकडे येतील तेव्हा डोळे पांढरे होतील यात शंका नाही.
- बाहुबलीच्या टेलिव्हिजन राईट्ससाठीही जबरदस्त स्पर्धा होती. सोनी टीव्हीनेतब्बल 51 कोटी रुपये मोजून टेलिव्हिजनचे हक्क आपल्यानावावर केले.
- बाहुबली 1 जेवढा भव्य दिव्य दिसला त्याहून शतपटीने अधिक अपेक्षा बाहुबली 2 कडून आहेत. अर्थात याची पूर्ण जाणीव दिग्दर्शक राजामौलींना आहे. त्यामुळे बाहुबली 2 बनवताना त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक सीनवर जबरदस्त मेहनत घेतलीय. खास करुन या सिनेमाचा क्लायमॅक्स. यायुद्धाच्या सीनवरती तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. रामोजी फिल्म सिटीमध्ये जवळपास दहा आठवडे ह्या युद्धाचं शुटिंग सुरु होतं.
- कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडणाऱ्या या सिनेमाचे खरे हिरो आहेत दिग्दर्शक राजामौली आणि अभिनेता प्रभास. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांना या सिनेमासाठी किती मानधन मिळालं? फोर्ब्ज इंडियाच्या अहवालानुसार बाहुबली 1 साठी राजामौलींना 26 कोटी आणि प्रभासला 20 कोटी रुपये इतकं दणदणीत मानधन मिळालं. पण त्यांनी केलेल्या मेहनतीच्या आणि सिनेमाला मिळालेल्या अफाट यशाच्या तुलनेत हे आकडे सुद्धा थोडे कमीच वाटतायत.
- बाहुबली सिनेमाने लोकांवर अक्षरश: जादू केली. यातल्या भव्य दिव्य सेट्सच्या तर लोक प्रेमाततच पडले. याच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दक्षिणेतल्या एका उद्योगपतीच्या मुलाचंहे लग्न. या लग्नासाठी बाहुबलीचे कला दिग्दर्शक साबू सिरील यांना मंडप सजावटीचं काम देण्यात आलं. बाहुबली स्टाईल मंडप बनवण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तुमचा विश्वास बसणार नाही पण बाहुबलीचा ओरिजनल सेट सात एकरात वसवला होता तर या लग्नासाठीचा मंडप हा तब्बल 10 एकर जागेत उभारला गेला.
- बाहुबलीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे यातले ग्राफीक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स. 800 हून अधिक ग्राफीक डिझायनर्सया सिनेमासाठी अहोरात्र राबत होते. त्यांच्या प्रयत्नातून बाहुबली नावाची अतिभव्य कलाकृती जन्माला आली.
- या सिनेमासाठी तब्बल 15000 स्टोरी बोर्ड्स बनवण्यात आले. भारतीय सिनेमाच्याइतिहासातआत्तापर्यंत सर्वात जास्त स्टोरी बोर्ड्स बनवण्याचा विक्रम बाहुबलीच्या नावावर नोंदवला गेला आहे.
- धबधबा म्हणजे बाहुबली सिनेमाची शान… धबधबा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्राफीक्स डिझायनर्स टीम तब्बल 2 वर्ष मेहनत घेत होती. आणि या धबधब्याच्या प्रत्यक्ष शुटिंगसाठी 109 दिवस लागले.
- बाहुबलीच्या निमित्ताने राजामौलींनी करण जोहरला एक खास गिफ्ट दिलं. जेव्हा ते धबधब्यावरचा सीन शूट करत होते तेव्हा ते दृश्य राजामौलींना खूप आवडलं. त्यांनी लगेचच एका चित्रकाराला बोलवलं आणि तो सीन कॅन्व्हासवर उतरवायला सांगितलं. चित्रकाराने काढलेलं तेच चित्र राजामौलींनी करण जोहरला गिफ्ट केलं. त्यामागाचं कारण म्हणजे करण जोहरने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी घेतलेली मेहनत.
- थोडक्यात बाहुबली भारतीय सिनेमाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कलाकृती आहे. इथून पुढे बाहुबलीकडे फक्त सिनेमा नाही तर मापदंड म्हणून पाहिलं जाईल यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement