Ayodhya Ram Mandir : जन्माने अयोध्यावासी अनुष्का-विराटचं खास कनेक्शन, प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेला हजेरी लावणार?
Anushka Sharma in Ayodhya Ram Mandir : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अयोध्येचं खास कनेक्शन आहे. अभिनेत्रीचा जन्म श्रीरामांच्या अयोध्या नगरीत झाला आहे.
Anushka Sharma Born in Ayodhya : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाचा देशभर जल्लोष पाहायला मिळत आहे. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला अनेक बॉलिवूडकर हजेरी लावणार आहेत. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचं मात्र अयोध्येसोबत खास कनेक्शन आहे. कोणताही गॉडफादर नसताना अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) जन्म श्रीरामांच्या अयोध्या नगरीत झाला आहे.
अयोध्या नगरीत जन्मलेली अनुष्का शर्मा
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अनुष्का शर्माचा जन्म अयोध्या नगरीत झाला आहे. अभिनेत्रीचं बालपण बंगळुरूमध्ये गेलं असलं तरी तिचा जन्म मात्र अयोध्येत झाला आहे. अनुष्काचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील अजय कुमार शर्मा (Ajay Kumar Sharma) हे अयोध्येतील भारतीय लष्कराच्या डोगरा रेजिमेंटचा भाग होते. अनुष्काचा जन्म 1 मे 1988 रोजी अयोध्येतील मिलिट्री रुग्णालयात झाला होता.
'या' सेलिब्रिटींचीही जन्मभूमी अयोध्या
अनुष्कासह पूजा बत्रा (Pooja Batra), लावण्या त्रिपाठी (Lavanya Tripathi), अबरार अल्वी (Abrar Alvi) आणि अभिषेक चौबे (Abhishek Chaubey) या सेलिब्रिटींचा जन्म अयोध्यामध्ये झाला आहे.
पूजा बत्रा (Pooja Batra)
अक्षय कुमार, गोविंदा आणि सलमान खान यांसारख्या सेलिब्रिटींसोबत स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री पूजा बत्राचा जन्म अयोध्येत झाला आहे. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये पूजाचा समावेश होतो.
लावण्या त्रिपाठी (Lavanya Tripathi)
अभिनेत्री लावण्या त्रिपाठीचा जन्म प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतच झाला आहे. लावण्याने अनेक दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे. 15 डिसेंबर 1990 रोजी लावण्याचा जन्म झाला. 'अंडाला राक्षसी' या सिनेमाच्या माध्यमातून लावण्याला लोकप्रियता मिळाली आहे.
अबरार अल्वी (Abrar Alvi)
'प्यारा','कागज के फूल','साहिब बीबी और गुलाम' सारख्या कलाकृतींचे कथानक लिहिणारे अबरार अल्वी यांचा जन्म अयोध्येत झाला. पुढे नागपूरमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते मनोरंजनसृष्टीकडे वळले.
अभिषेक चौबे (Abhishek Chaubey)
लोकप्रिय सिने-दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचा जन्म अयोध्येत झाला आहे. विशाल भारद्वाज यांच्या 'मकडी' सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आलं आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ते आलिया भट्टपर्यंत (Alia Bhatt) अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांना प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला पोहोचले आहेत. अनुष्कासह विराट कोहलीदेखील (Virat Kohli) हजेरी लावेल.
अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, रजनीकांत, धनुष, यश, प्रभास, राम चरणसह अरुण गोविल, दीपिका चिखलियासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.
संबंधित बातम्या