Avatar 2 Box Office Collection : निळ्या विश्वाची जादू कायम; 'अवतार 2' लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा
Avatar 2 : 'अवतार 2' या सिनेमाने आतापर्यंत 147.30 कोटींची कमाई केली आहे.
Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
जाणून घ्या 'अवतार द वे ऑफ वॉटर'चं कलेक्शन (Avatar The Way Of Water Collection) :
'अवतार' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 13 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच 'अवतार द वे ऑफ वॉटर' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागाप्रमाणे अवतारचा दुसरा भागदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतात या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.3 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 46 कोटी तर चौथ्या दिवशी 18.50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 147.30 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस - 40.3 कोटी
- दुसरा दिवस - 42.5 कोटी
- तिसरा दिवस - 46 कोटी
- चौथा दिवस - 18.50 कोटी
- एकूण - 147.30 कोटी
जगभरात 'अवतार 2'चा बोलबाला (Avatar 2) :
'अवतार 2'ची घौडदौड पाहता हा सिनेमा लवकरच 250 कोटींचा टप्पा पार करणार आहे. अवतारच्या पहिल्या भागाने रिलीजच्या काही दिवसांत 109 कोटींची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या भागाने तीनच दिवसांत हा रेकॉर्ड मोडला आहे. आतापर्यंत जगभरात या सिनेमाने 3500 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
सिनेप्रेमी सध्या अवतारच्या दुसऱ्या भागाचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा हॉलिवूडचा या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरू शकतो. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.
संबंधित बातम्या