एक्स्प्लोर

AMKDT : अजय आणि तब्बूचा रोमान्स, 'औरों में कहां दम था' चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला

Auron Mein Kahan Dum Tha Release Date : 'औरों में कहां दम था' चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि तब्बू सध्या त्यांच्या 'औरों में कहां दम था' (Auron Mein Kahan Dum Tha) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू दोघांही रोमान्स करताना दिसणार आहेत. अजय देवगण आणि तब्बू दोघांची मैत्री साऱ्यांना माहित आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर रोमॅन्टिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या नवीन रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

अजय आणि तब्बूचा रोमान्स

अजय देवगण आणि तब्बू स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट 'औरों में कहाँ दम था' बद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट यापूर्वी 5 जुलै 2024 रोजी रिलीज होणार होता. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर चित्रपटाच्या मुख्य कलाकारांनी 'औरों में कहाँ दम था' ची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. जाणून घेऊया अजय आणि तब्बूचा हा रोमँटिक ड्रामा मोठ्या पडद्यावर कधी येणार?

'औरों में कहाँ दम था' कधी रिलीज होणार? (Auron Mein Kahan Dum Tha)

फ्रायडे फिल्मवर्क्स कंपनी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटकडून 'औरों में कहाँ दम था' चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. कंपनीने या चित्रपटाच्या रिलीज डेटची नवी घोषणा केली आहे. कंपनीने 3 जुलै रोजी इंस्टाग्रामवर एक नोट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली होती. यासोबतच  लवकरच नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं होतं. तेव्हापासून चाहते याची वाट पाहत होते आणि आता अखेर चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

तब्बूची खास इंस्टाग्राम पोस्ट

अजय आणि तब्बूने इन्स्टाग्रामवर 'औरों में कहाँ दम था' चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपट प्रदर्शित होण्याची नवी तारीख जाहीर केली आहे. 'औरों में कहाँ दम था'चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. तब्बूने इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 2 ऑगस्टला प्रतीक्षा संपेल!

शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर सहाय्यक भूमिकेत

'और में कहाँ दम था' हा नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि जिमी शेरगिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच अभिनेता शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.  या चित्रपटाचा पहिला टीझर व्हिडीओ 31 मे 2024 रोजी रिलीज झाला होता. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर आपली जादू कशी चालवतो हे पाहावं लागणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Karan Johar : बॉलिवूडमध्ये फक्त 10 अभिनेते कामाचे, तेही चंद्र-तारे मागतायत; फिल्म इंडस्ट्रीतील वाईट परिस्थितीवर करण जोहरने मौन सोडलं

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
Arbaz Shaikh Sairaat: 'सैराट' सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, 'मिरवणूकीत मी...'
'सैराट' सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, 'मिरवणूकीत मी...'
Gulabi Saadi Fame Prajakta Ghag: नाही तर शनायाच्या जागी.. गुलाबी साडी फेम अभिनेत्रीला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसाठी ऑफर, पण
नाही तर शनायाच्या जागी.. गुलाबी साडी फेम अभिनेत्रीला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसाठी ऑफर, पण

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget