(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan Support : आर्यन खानच्या अटकेमुळे अनेक कलाकारांनी केला शाहरुख आणि गौरी खानला पाठिंबा
चित्रपटनिर्माते जोया अख्तर, जॉनी लिव्हर आणि अभिनेत्री रवीना टंडनसह अनेक सेलिब्रिटी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान सोबत आहेत.
Aryan Khan Support : चित्रपटनिर्माते जोया अख्तर, जॉनी लिव्हर आणि अभिनेत्री रवीना टंडनसह अनेक सेलिब्रिटी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान सोबत आहेत. सध्या शाहरुखचा मुलगा आर्यन ड्रग्ज प्रकरणामुळे अटकेत आहे.
शाहरुख आणि गौरीचा मुलगा आर्यन ड्रग्ज प्रकरणामुळे अटकेत असल्याने चित्रपट निर्माते जोया अख्तर, जॉनी लिव्हर आणि अभिनेत्री रवीना टंडनसह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी शुक्रवारी सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानसोबत असल्याचे सांगितले आहे.
एनसीबीने रविवारी एका क्रूझवर चाललेल्या पार्टीत आर्यन खान सामील असल्याने त्याला पकडले होते. क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबई कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता तुरूंगातच रात्र घालवावी लागणार आहे. ही बातमी समोर येताच शाहरुखच्या चाहत्यांनी वांद्रे येथील शाहरुखच्या राहत्या घरी मन्नतबाहेर गर्दी केली. काही लोकांनी हातात बॅनर घेतले आहेत. त्यावर लिहिले आहे, "ही वेळदेखील निघून जाईल".
काल गौरीचा वाढदिवसदेखील होता. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना आणि शाहरुखच्या मित्रांना वाटत होते की, आर्यनची सुटका होईल. जोया अख्तरने इंस्टाग्रामवर गौरी खानला 51 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जोयाने सिंहिणीचा आणि तिच्या बछड्याचा फोटो शेअर केला आणि लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा गौरी, अशीच हिमंत ठेव".
"या" कलाकारांनी देखील दिल्या शुभेच्छा
फराह खानने देखील आता गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिची हिंमत वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. फराहने एक जुना फोटो शेअर करत गौरीची हिमंत वाढवायचा प्रयत्न केला आहे.
फराहने पोस्टमध्ये काय लिहलंय?
आज गौरी खानचा वाढदिवस आहे. शाहरुख आणि गौरीसोबत फराहचे कौटुंबिक संबंध असल्याने तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा गौरी आणि शाहरुखचा जुना फोटो आहे. त्या फोटोवर फराहने कॅप्शन लिहिले आहे, की "एका आईच्या हिंमतीची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. आई-वडिलांच्या प्रार्थनेत इतकी शक्ती असते की ते एखादा डोंगरदेखील हालवू शकतात". त्यासोबत फराहने गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आणि लिहिले, "मागील आठवड्यात मी जगातली सगळ्यात सामर्थ्यवान आई पाहिली". तिने शाहरुख आणि गौरीचा जुना एकत्रित फोटो शेअर करत गौरीला वाढदिवसाची भेट दिली. आणि असे लिहिले की, "हा फोटो म्हणजे आतापर्यंतचा सगळ्यात आवडता फोटो आहे".
जॉनी लिव्हर - ऋतिकनेदेखील केला सपोर्ट
शाहरुख सोबत अनेक चित्रपटांत काम केलेले दिग्गज अभिनेते जॉनी लिव्हर यांनी ट्विटरच्या माध्यमातून समर्थन केले आहे. त्याने 1998 सालातला 'कुछ कुछ होता है' सिनेमातला फोटो शेअर करत ताकद दाखविणारा इमोजीदेखील शेअर केला. अभिनेता ऋतिक रोशनने गुरूवारी इंस्टाग्रामवर आर्यनच्या नावाचे पत्र लिहिले होते. त्यात त्याने लिहिले होते, "हा कठीण काळ आर्यनला आणखी मजबूत बनवेल".