Aryan Khan Drugs Case : SRKच्या ड्रायव्हरची साक्ष नोंदवली, क्रूझ ड्रग प्रकरणी आणखी एक ताब्यात
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आता अनेक नवनवीन आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता शाहरुख खानच्या ड्रायव्हरनं साक्ष नोंदवल्याचं बोललं जात आहे.
Cruise Drugs Party : एनसीबीने मुंबईजवळील क्रूझ पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतले आहे. दरम्यान एनसीबीनं शाहरुख खानच्या ड्रायव्हरनं आपली साक्ष नोंदवली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी शाहरुखच्या ड्रायव्हरची साक्ष नोंदवण्यात आली.
शाहरुखच्या ड्रायव्हरची साक्ष नोंदवली
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरनं काल (शनिवारी) एनसीबीच्या कार्यालयात आपली साक्ष नोंदवली. तो शनिवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात पोहोचला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याची साक्ष नोंदवली. त्यानंतरच त्याला जाऊ दिलं. दरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री गोरेगावासह मुंबईतील उपनगरांत छापा टाकला. ड्रग्ज प्रकरणात सामील असलेल्या सांताक्रूझमधील शिवराज रामदास नावाच्या आणखी एका व्यक्तीला अटक केली.
क्रूझ ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत 19 जणांना ताब्यात घेतलंय
क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत एकूण 19 जणांना ताब्यात घेतलं आहे. ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. गेल्या रविवारी गोव्याला जाणाऱ्या क्रूझ पार्टीत एनसीबीने छापा टाकला होता. त्यात आर्यन खानसह अनेकांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासह इतरांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एकूण 19 जण सध्या एनसीबीच्या ताब्यात आहेत.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. क्रूझवर अमंली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचा दावा एनसीबीकडून सातत्यातनं केला जात आहे. एनसीबीने शनिवारी निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयात चौकशी केली. क्रूझवर पुरवल्या जाणाऱ्या मादक पदार्थांसंबंधी एनसीबीनं खत्री यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतल्यातची माहिती मिळत आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमंली पदार्थ जप्ती प्रकरणातील आरोपींच्या चौकशी दरम्यान खत्रीचं नाव पुढे आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी आरोप केला होता की, एनसीबीने सुरुवातीला क्रूझ पार्टी प्रकरणातील छापेमारीनंतर 11 लोकांना ताब्यात घेतले होते. पण त्यातील 3 जणांना सोडण्यात आले. त्यात भाजप नेते मोहित भारतीयच्या मेव्हणाचा देखील समावेश होता. यासंदर्भात भारतीय यांनी नवाब मलिकांवर पलटवार करत त्यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं होतं.