एक्स्प्लोर

A. R. Rahman: 'खराब ऑडिओ सिस्टिम, गर्दी आणि चेंगराचेंगरी', चेन्नईतील कॉन्सर्टनंतर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; ए आर रहमान ट्वीट शेअर करत म्हणाला...

A. R. Rahman: अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन सांगितलं की, ए आर रहमानच्या (AR Rahman) कॉन्सर्टमध्ये खराब ऑडिओ सिस्टिम होती.

A. R. Rahman: चेन्नईमध्ये रविवारी (10 सप्टेंबर)  संगीतकार ए आर रहमानच्या (A. R. Rahman) कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. हे  कॉन्सर्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण आता अनेक नेटकरी ट्विटरवर या कॉन्सर्टच्या खराब व्यवस्थापनामुळे संताप व्यक्त करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन तक्रार केली आहे की, कॉन्सर्टमध्ये खराब ऑडिओ सिस्टिम होती. तसेच कॉन्सर्टच्या ठिकाणी झालेल्या गर्दीचा व्हिडीओ देखील अनेकांनी शेअर केला आहे. काही लोकांना या कॉन्सर्टची तिकिटे खरेदी करुनही या कॉन्सर्टमध्ये  प्रवेश करता आला नाही. आता या सर्व गोष्टींबाबत ए आर रहमाननं एक ट्वीट शेअर केलं आहे.

ए आर रहमानचं ट्वीट

ए आर रहमाननं ट्वीटमध्ये लिहिलं, 'प्रिय चेन्नई मक्कले, तुमच्यापैकी ज्यांनी तिकिटे खरेदी केली आहेत आणि दुर्दैवी परिस्थितीमुळे जे  कॉन्सर्टमध्ये प्रवेश करू शकले नाहीत, कृपया तुमच्या तक्रारींसह arr4chennai@btos.in वर तुमच्या तिकीट खरेदीची एक प्रत शेअर करा. आमची टीम लवकरात लवकर प्रतिसाद देईल.'

चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोड येथील आदित्यराम पॅलेस सिटीमध्ये 'माराकुमा नेंजाम' नावाचे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. एका नेटकऱ्यानं या कॉन्सर्टबाबत  ट्वीट शेअर केले होते.या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'खूप वाईट ऑडिओ सिस्टिम होती. कोणतेही गाणे किंवा संगीत ऐकू येत नव्हते. खूप गर्दी, चेंगराचेंगरी झाली. आम्हाला याचा रिफंड पाहिजे'

'भयानक साऊंड सिस्टिम, क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे विकली गेली होती. सर्व उशिरा येणारे लोक रस्त्यावर बसले होते.' असंही ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे.

एका युझरनं ट्वीट केलं,'ए आर रहमान कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी झाली. कॉन्सर्टमधून अनेकांना परत पाठवले गेले आहे. अनेकांकडे पास असूनही त्यांना आत प्रवेश दिला जात नाव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बऱ्याच वेळ प्रवास करुन आलेल्या लोकांना पार्किंगची देखील मोठी समस्या होती.'

इतर महत्वाच्या बातम्या: 

A. R. Rahman: ए. आर. रहमान यांचा पुण्यातील शो पोलिसांनी पाडला बंद; 10 वाजल्यानंतरही शो सुरु असल्यानं पोलिसांनी स्टेजवर जाऊन सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget