एक्स्प्लोर

'भारताकडून ऑस्करला चुकीचे चित्रपट पाठवले जातात'; ए.आर. रहमानच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

काही महिन्यांपूर्वी ऑस्कर विजेता ए.आर. रहमाननं (AR Rahman) भारताकडून ऑस्करला पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल एक वक्तव्य केलं होतं.

AR Rahman On Oscars: ऑस्कर- 2023 (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यात भारतानं दोन कॅटेगिरीमधील पुरस्कार पटकावले. नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याने ऑस्कर-2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग कॅटेरगरीमधील पुरस्कार जिंकला. तर 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटानं डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. देशभरातील लोकांनी ऑस्कर विजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपूर्वी ऑस्कर विजेता ए.आर. रहमाननं (AR Rahman) भारताकडून ऑस्करला पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याची चर्चा सध्या होत आहे. 

काय म्हणाला होता ए.आर. रहमान? 

ए.आर. रहमानने जानेवारी महिन्यात एल सुब्रमण्यम यांना एक मुलाखत दिली होती. एल सुब्रमण्यम यांच्यासोबत चर्चा करताना त्याने भारताकडून ऑस्करला पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, "कधी कधी, मी पाहतो की आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात. पण त्यांना पुरस्कार मिळत नाहीत. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत. समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. इथे काय चालले आहे हे पाहण्यासाठी मला पाश्चिमात्य देशातील लोकांप्रमाणे विचार करावा लागेल. तर ते काय करत आहेत, हे आपल्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं पाहिजे." ए.आर. रहमानच्या या वक्तव्याची चर्चा सध्या होत आहे.  

पाहा व्हिडीओ

ए.आर. रहमान हा केवळ संगीतकार नाही तर तो गायक, गीतकार आणि निर्माता देखील आहे. 2009 मध्ये ए.आर. रहमानने दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले. ए.आर. रहमाननं 'दिल से', 'ख्वाजा मेरे ख्वाजा', 'जय हो''बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'पुकार', 'फिजा', 'लगान', 'स्वदेस', 'जोधा-अकबर', 'युवराज', 'स्लमडॉग मिलेनियर' आणि 'मोहेंजो दारो' या चित्रपटांना संगीत दिलं. ए. आर. रहमानला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'स्लम डॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी त्याला गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि ग्रॅमी यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

ऑस्कर सोहळ्यात भारताचा डंका 

'द एलिफंट विस्परर्स' हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीतील ऑस्कर पुरस्कार या माहितीपटानं जिंकला. गुनीत मोगाने 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाची निर्मिती केली आहे तर कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाल. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्कर जिंकला. आरआरआर या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Oscar 2023 After Party: ऑस्कर जिंकल्यानंतर RRR चित्रपटाच्या टीमची जंगी पार्टी; एस.एस राजामौली यांच्या घरातील सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane PC | सुरुवात त्यांनी केली,सरकार धडा शिकवणार! नागपूरच्या घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रियाEknath Shinde PC : लोकभावनेच्या विरोधात जाऊन कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले..Udayanraje Bhosale PC : शिवरायांचे विचार महाराष्ट्राला एकसंघ ठेवतात,नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्य थांबवाABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
Embed widget