एक्स्प्लोर
'सुलतान' मध्ये अनुष्काचा देसी आणि रफ अँड टफ अंदाज

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या आगामी 'सुलतान'ची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील सलमानचा लूक तर आधीच पाहिला आहे. पण यशराज फिल्म्सने आता सुलतानचं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये सिनेमातील मुख्य अभिनेत्री अनुष्का शर्मा रफ अँड अंदाजात दिसत आहे. सिनेमाच्या टीझर तसंच पोस्टरमध्ये आतापर्यंत अनुष्का कुठेच दिसली नाही. शिवाय तिचा उल्लेखही नव्हता. मात्र आता अनुष्का असलेलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अनुष्का एका पुरुष पैलवानाला धोबीपछाड़ देताना दिसत आहे. सिनेमात अनुष्काचं नाव अरफा आहे. https://twitter.com/AnushkaSharma/status/725920170032529408 एकीकडे अनुष्का कूल आणि देसी लूकमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे सलमान खान रांगड्या पैलवानाच्या लूकमध्ये आहे. 'सुलतान' या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यंदा ईदला 'सुलतान' प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा























