Ananya : बहुचर्चित 'अनन्या' नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार
Ananya : येत्या रविवारी 'अनन्या' नाटकाचा 300 वा प्रयोग रंगणार आहे.
Ananya Natak : बहुचर्चित 'अनन्या' नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे. नाटक आणि प्रेक्षकांमधील दुवा असणारी रंगभूमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शांत होती. सध्या अनेक नाटकांचे प्रयोग पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगत आहेत. लॉकडाऊन आधी अनेक नाटकांचे जोरदार प्रयोग सुरू होते. त्यात 'अनन्या' नाटकाचादेखील समावेश होता.
सुयोग, ऐश्वर्या, आर्य निर्मित 'अनन्या' हे नाटक आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. तर प्रमोद पवार, विशाल मोरे, अनघा भगरे, करण बेंद्रे आणि सिद्धार्थ बोडके सहाय्यक भूमिकेत आहेत. अनन्याचे लॉकडाऊन आधी 297 प्रयोग प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात पार पडले होते.
View this post on Instagram
'अनन्या' नाटकाचा आता चार मार्च 2022 रोजी दुपारी साडे चार वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये 298 वा प्रयोग होणार आहे. पाच मार्च 2022 रोजी दुपारी साडे चार वाजता बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात 299 वा प्रयोग पार पडणार आहे. तर सहा मार्च 2022 रोजी दुपारी साडे चार वाजता विले पार्लेतील नाट्यगृहात 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे.
'अनन्या' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अनन्या सिनेमा 31 जुलै 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहिर झालेली नाही. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Jhimma : 'झिम्मा'ची सिनेमागृहात शंभरी, 15 व्या आठवड्यात केले पदार्पण
Ajay-Atul : अजय-अतुलच्या संगीत मैफिलची मेजवानी आता घरबसल्या, 'मराठी भाषा दिनी' रंगणार भव्य संगीत सोहळा
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]
[/yt]