एक्स्प्लोर
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभचे सॅमसंगला ट्विट
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी सॅमसंगवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. अमिताभकडे सॅमसंगचा गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन आहे. सदोष बॅटरीमुळे गेल्या काही दिवसात हा फोन पेट घेत आहे. त्यामुळे अमिताभने ट्विटवरुन सॅमसंग कंपनीकडे दाद मागितली आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी नोटमधील बॅटरीमध्ये सदोष बॅटरीमुळे स्फोट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कंपनीने जगभरातील सर्व स्मार्टफोन परत मागवले आहेत. तसंच विमानातही या फोनच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. भारतातही या फोनचं लॉन्चिंग अजून झालेलं नाही.
अमिताभ बच्चन वापरत असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 ची बॅटरी फक्त 60 टक्क्यांपर्यंत चार्ज होत आहे. त्यामुळे ती 100 टक्के कधी चार्ज करता येणार असा सवाल अमिताभने विचारला आहे. तसंच लवकर प्रतिसाद देण्याचीही विनंतीही केली आहे.
https://twitter.com/SrBachchan/status/781805456914194433
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement