एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vikram Gokhale: जेव्हा मुंबईमध्ये विक्रम गोखलेंचं नव्हतं घर, तेव्हा बिग बी आले होते मदतीला धावून

विक्रम गोखले (Vikram Gokhale) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यामध्ये मैत्री होती. जेव्हा विक्रम गोखले यांचे मुंबईमध्ये घर नव्हते तेव्हा बिग बींनी त्यांना मदत केली होती. 

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाल्यानं मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यामध्ये मैत्री होती. जेव्हा विक्रम गोखले यांचे मुंबईमध्ये घर नव्हते तेव्हा बिग बींनी त्यांना मदत केली होती. 

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विक्रम गोखले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे राहायला घर नव्हते. विक्रम गोखले हे मुंबईत राहण्यासाठी घर शोधत होते. एका मुलाखतीत विक्रम गोखले यांनी सांगितलं होतं की, अमिताभ यांनी त्यांना मुंबईत घर मिळवून देण्यासाठी मदत केली होती. 

'स्ट्रगलच्या काळात जेव्हा  मी मुंबईत आलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. राहण्यासाठी डोक्यावर छप्पर नव्हते, मी राहण्यासाठी घर शोधत होतो. अमिताभ बच्चन यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये मला घरासाठी मदत करण्याची शिफारस करण्यात आली होती. बिग बींच्या मदतीने मला महाराष्ट्र सरकारकडून सरकारी निवासस्थान मिळाले.' असं विक्रम गोखले यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

विक्रम गोखले यांनी सांगितलं होतं की,'मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की, आम्ही दोघे गेल्या 55 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि चांगले मित्र आहोत.' अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांनी परवाना, अग्निपथ आणि खुदा गवाह यांसारख्या हिट हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 

 एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते.  अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.   तसेच या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री या व्यक्तीरेखनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vikram Gokhale: भूमिका जगणारा आणि भूमिका घेणारा कलावंत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget