Amitabh Bachchan : अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी सुद्धा घेतली जमीन; मोक्याच्या जागेसाठी किती कोटी मोजले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. यासाठी त्यांनी तब्बल 14 कोटी रुपये खर्च केले आहेत.
![Amitabh Bachchan : अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी सुद्धा घेतली जमीन; मोक्याच्या जागेसाठी किती कोटी मोजले? Amitabh Bachchan buys plot in Ayodhya for 14.5 crore ahead of Ram Mandir Pran Prathista Know Bollywood Entertainment Latest Update Amitabh Bachchan : अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी सुद्धा घेतली जमीन; मोक्याच्या जागेसाठी किती कोटी मोजले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/15/e25339d502d18f65ce34d6d770a552dc1705289415820254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. पण यंदा बिग बी कोणत्याही कलाकृतीमुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं त्यांना खास आमंत्रण देण्यात आलं आहे. अशातच आता ते अयोध्यावासी होणार असल्याचं समोर आलं आहे.
अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी
बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी केला आहे. 10,000 स्केअर फुटाच्या या फ्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बिग बींनी 'द हाऊस ऑफ अभिनंद लोढा' या बॅनरअंतर्गत अयोध्येत प्लॉट विकत घेतला आहे. अद्याप बिंग बींनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
अमिताभ बच्चन यांच्या अयोध्येतील घराच्या कामाला 22 जानेवारी 2024 पासून सुरुवात होऊ शकते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राममंदिराचं उद्घाटन करत असताना दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या फ्लॉटवर काम सुरू होईल.
अयोध्यावासी होण्यासाठी अमिताभ बच्चन उत्सुक
आपल्या गुंतवणूकीबाबत निकटवर्तीयांसोबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले,"अयोध्येत सरयूच्या 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'सोबत नवा प्रवास करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अयोध्येचं एक विशेष स्थान आहे. आध्यात्मिकता, सांस्कृतिक समृद्धी आणि भौगोलिक सीमांनी एक भावनात्मक संबंध निर्माण केला आहे. या जागतिक आध्यात्मिक राजधानीत आपलं घर व्हावं अशी इच्छा आहे".
'या' सेलिब्रिटींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटीदेखील उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रनौत, आशा भोसले, अरुण गोविल, दीपिका चिथालिया, नितीश भारद्वाज, मधुर भंडारकर, प्रसून जोशी, रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अडाणी, चंद्रशेखरन, एसएन सुब्रम्हण्यम, सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, अनूप जलोटा, अनुराधा पौडवाल, कैलाश खेर, मैथिली ठाकूर, कन्हैया मित्तल, स्वाती मिश्रा, रंजन गोगाई, सुधीर अग्रवालसह अनेक मंडळी सामील होणार आहेत.
राम मंदिर उद्घाटनामुळं आसपासच्या जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीला एक बूस्टर डोस मिळाला आहे. तेथील हॉटेल उद्योग, छोटे व्यापारी आणि स्थानिक उद्योग आता जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणार आहेत. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. देशभरात राम मंदिराचा उत्साह पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
राम मंदिराबरोबरच अयोध्येत हजारो कोटींची गुंतवणूक होणार, 'या' कंपन्या गुंतवणार पैसे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)