एक्स्प्लोर

Kiran Mane: "ॲंग्री यंग मॅन हा मनात, मेंदूत,रक्तात भिनला.."; बिग बींच्या वाढदिवसानिमित्त किरण मानेची खास पोस्ट

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बिग बींना (Amitabh Bachchan) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे.  अमिताभ बच्चन यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 

किरण माने यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर " नमस्कार मी मुंबईचा किरण माने" असं लिहिलेलं दिसत आहे. किरण माने यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबॉसमध्ये 'सातारचा बच्चन' हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती. पण तरीबी 'मराठी मीम माँक्स'वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलं होतं. शाळेत असल्यापासून या टोमन्याची सवय आहे मला."किरन्या माने स्वत:ला बच्चन समजतो." हे लहानपासूनच ऐकत आलोय. खरंतर म्हणणाऱ्यानं ते चिडून म्हणलेलं असायचं, पण मनातल्या मनात मी लै खुश व्हायचो ! ल्हानपनी 'बच्चन' हे माझं 'जग' होतं. मायनीच्या 'गरवारे टुरींग टॉकीज'च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापासून मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता. रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो.मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची.बच्चनचं चालनं - बोलणं- बघणं - उभं रहाणं- बसणं - पळणं - फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलं होतं लहानपणी."

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढणारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेणारा 'ॲंग्री यंग मॅन' मनामेंदूत,रक्तात भिनला! आता तरूनपणी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुणावर अन्याय झाला की, पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हणाला लागले, "हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?" ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !"

 "पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत ! तोच 'ॲंग्री यंग मॅन' वैयक्तिक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाणारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा हा 'शहेनशाह' बघून वाईट वाटायला लागलं.  पुर्वी पेट्रोल 60 रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी 'चुप्पी साधलेला' बघून आश्चर्य वाटायला लागलं. कुणाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करन्याची पोस्ट करणारा.  ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसणारा. केविलवाना बच्चन बघून कीव यायला लागली.  पण लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो 'बच्चन' आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला 'बच्चन'  हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की...जिवंत - रसरशीत - खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम." असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Amitabh Bachchan Birthday: आर्थिक अडचणींमुळे मरीन ड्राईव्हच्या बाकावर काढावी लागली रात्र; तरीही मागे हटले नाहीत 'शेहनशाह'; असा सुरु झाला हिट चित्रपटांचा 'सिलसिला'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget