Singham Again vs Pushpa 2: पुष्पा आणि सिंघमची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; कोण बाजी मारणार ? नेटकरी म्हणतात...
Singham Again vs Pushpa 2: तरण आदर्शन यांनी एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे की, अजयच्या ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

Singham Again vs Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची आणि अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतीच तरण आदर्शन यांनी एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे की, अजयच्या ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता ‘सिंघम अगेन’ की पुष्पा-2 या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'CONFIRMED,आता सिंघम अगेन विरुद्ध पुष्पा2 होणार आहे.' तरण आदर्श यांच्या या ट्वीटला कमेंट करुन कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याबाबत नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.
CONFIRMED… It’s #SinghamAgain vs #Pushpa2… #AjayDevgn vs #AlluArjun… #RohitShetty vs #Sukumar on #IndependenceDay 2024.
— taran adarsh (@taran_adarsh) September 11, 2023
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सिंघम पुन्हा त्याचे 13 वर्षांचे वर्चस्व दाखवणार आहे.' तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं,'मला अजूनही वाटतं अगर पुष्पा 2 आणि सिंघम 3 यांची टक्कर झाली तर सिंघम 3 ओपनिंग-डेला चांगली कमाई करेल. सिंघमची क्रेझ आहे.'
Singham again will show the 13 years supremacy 🔥🔥🔥
— Dr.Vardhman (@vardhmandagli) September 11, 2023
काल (11 सप्टेंबर) अल्लू अर्जुननं (Allu Arjun) ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन 'पुष्पा: द रूल' या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाला 'पुष्पा: द रूल' (Pushpa The Rule) हा चित्रपट रिलीज होणार आहे.
August 15th 2024!!!#Pushpa2TheRule pic.twitter.com/YHynsXLPB4
— Allu Arjun (@alluarjun) September 11, 2023
तसेच अजयच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची घोषणा देखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती.सिंघम या चित्रपटाच्या दोन भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिंघम हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता तर 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स हा चित्रपट रिलीज झाला होता. आता 'सिंघम अगेन' हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
