Allu Arjun, Pushpa 2 : अल्लू अर्जुनची वाढती क्रेझ, ‘पुष्पा 2’साठी अभिनेत्याला मिळणार ‘इतके’ मानधन!
Allu Arjun, Pushpa 2 : 'पुष्पा: द राईज'नंतर (Pushpa The Rise) साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) फॅन फॉलोइंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
Allu Arjun, Pushpa 2 : 'पुष्पा: द राईज'नंतर (Pushpa The Rise) साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) फॅन फॉलोइंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुन देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळेच आता त्याला 'पुष्पा 2'साठी (Pushpa 2) मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. मानधनाची ही रक्कम इतकी मोठी आहे की, त्याने या बाबतीत बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणजेच अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बरोबरी केली आहे. अर्थात आता अल्लू अर्जुनने आता सलमान खानला तगडी टक्कर दिली आहे.
'पुष्पा द राईज'च्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला 125 कोटी रुपये मानधन दिले जात असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे बजेट 450 कोटी असल्याचा दावाही केला जात आहे.
450 कोटी रुपयांचं बजेट!
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला या चित्रपटासाठी जवळपास 75 कोटी रुपये मानधन मिळाले आहेत. 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मितीवर सुमारे 450 कोटी रुपये खर्च होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
'पुष्पा: द रूल' या चित्रपटात 'पुष्पा: द राईज' प्रमाणेच प्रेक्षकांना ड्रामा, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' हा चित्रपट जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटातील डायलॉग, कथानक आणि चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटाने सिनेमागृहात 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
शूटिंगला सुरुवात!
मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा: द रूल' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदना हे पहिल्या भागातील कलाकार दिसणार आहेत. तसेच, 'पुष्पा 2'मध्ये विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. आज 22 ऑगस्ट 2022 रोजी 'पुष्पा: द रूल' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
अल्लू अर्जुन आणि सलमान खान या दोघांचेही फॅन फॉलोइंग मजबूत आहे. दोघांचे चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचवेळी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ 2023पर्यंत थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा: