(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranbir Alia Wedding : आलिया-रणबीर 'या' महिन्यात घेणार सात फेरे
Ranbir Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
Ranbir Alia Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरच्या लग्नाचं ठिकाणही निश्चित झालं आहे. रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेरे घेणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला 450 मंडळी उपस्थित राहणार आहेत.
View this post on Instagram
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2021 मध्ये लग्नबंधनात अडकणार होते. पण कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले. पण आता ते या एप्रिल महिन्यात सात फेरे घेणार आहेत. आलिया-रणबीर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Malaika Arora : मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज
Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केला 'विक्रम वेधा' मधील लूकचा खास फोटो; सबा आझादच्या कमेंटनं वेधलं लक्ष
The Kashmir Files : 'हा चित्रपट नाही तर...'; करण जोहरनं 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha