एक्स्प्लोर
अक्षय कुमारच्या सूर्यवंशीचा पहिला लूक समोर, चित्रपटाची रिलीजिंग डेटही ठरली
अक्षय कुमारने ट्विटरवरुन आपल्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या सिनेमात अक्षय एटीएस चीफ वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयची हिरोईन कोण असणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मुंबई : 'सिंघम' आणि 'सिम्बा'नंतर रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारने ट्विटरवरुन आपल्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या सिनेमात अक्षय एटीएस चीफ वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयची हिरोईन कोण असणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
'रोहित शेट्टीच्या पोलिस युनिव्हर्समधून... फायर पॅक्ज सूर्यवंशीसाठी सज्ज व्हा' असं कॅप्शन देत अक्षयने फोटो शेअर केला आहे. करण जोहरच या सिनेमाची निर्मिती करत असून शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटिंगचं पहिलं शेड्यूल गोव्यात पार सुरु आहे.
सिम्बा चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनला अक्षय कुमारची झलक पाहायला मिळाली होती. सिम्बाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. त्यामुळे सूर्यवंशीलाही तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.From #RohitShetty’s Police universe, get ready for the fire-packed #Sooryavanshi 🔥, releasing on Eid 2020!@karanjohar @RelianceEnt @RSPicturez @DharmaMovies #CapeOfGoodFilms pic.twitter.com/lGEsdaznwi
— Akshay Kumar (@akshaykumar) March 5, 2019
साराभाई सत्याग्रहावर आधारित अक्षयचा 'केसरी' चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. याशिवाय तो गुड न्यूज, मिशन मंगल, हाऊसफुल 4 यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या अक्षय करिना कपूरसोबत गुड न्यूज सिनेमाचं शूटिंग करत आहे.A bullet for a bullet! Get ready for #RohitShetty’s #Sooryavanshi 🔥 on Eid 2020. Action-packed, masala intact! @karanjohar @RelianceEnt @RSPicturez @DharmaMovies #CapeOfGoodFilms pic.twitter.com/wM2G3Vx1IO
— Akshay Kumar (@akshaykumar) March 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
