एक्स्प्लोर
Advertisement
अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित ‘गोल्ड’चा ट्रेलर रिलीज
रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि स्वत: अक्षय कुमार या तिघांनी मिळून ‘गोल्ड’ सिनेमाची निर्मिती केली आहे. सलमानही या सिनेमाचा भाग बनला होता, मात्र त्यांने यातून काढता पाय घेतला. रीमा कागती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं ‘गोल्ड’ मिळवून देणाऱ्या संघातील एका खेळाडूची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.
‘गोल्ड’चा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमार म्हणाला, “वो ख़्वाब जिसने हमारे पूरे देश को एक साथ जोड़ दिया, देखिए भारत टीम की यह कहानी #Gold में.”
12 ऑगस्ट 1948 रोजी ऑलिम्पिकमध्ये भारताने स्वतंत्र देशाच्या रुपात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं.
या स्वातंत्र्य दिनी भारतीयांना ‘गोल्ड’ पाहता येणार आहे. त्यावेळची स्थिती, कहाणी मोठ्या पडद्यावर या सिनेमाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
या सिनेमात अक्षय कुमारसोबत मौनी रॉय, विनीत कुमार, अमित साध यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. मौनी रॉय या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत असून, विनीत कुमार याआधी ‘मुक्केबाज’ सिनेमात दिसला होता.
रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि स्वत: अक्षय कुमार या तिघांनी मिळून ‘गोल्ड’ सिनेमाची निर्मिती केली आहे. सलमानही या सिनेमाचा भाग बनला होता, मात्र त्याने यातून काढता पाय घेतला. रीमा कागती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.
येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2018 रोजी ‘गोल्ड’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा ‘गोल्ड’चा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement