एक्स्प्लोर
Advertisement
STD बूथप्रमाणे टॉयलेट उभारा, अक्षय कुमारचा सल्ला
मुंबई: अभिनेता अक्षय कुमारने 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' या कार्यक्रमात हागणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी मोलाचा सल्ला दिला.
महाराष्ट्र सरकारने जुन्या STD/ISD टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे, असं अक्षय कुमार म्हणाला.
"ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र" या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमार एकाच मंचावर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
सरकारला सल्ला
"महाराष्ट्र सरकारने जुन्या STD/ISD टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे. त्याचं स्थान अर्थात लोकेश समजण्यासाठी एक टॉयलेट अॅप बनवावं, ज्यामुळे लोकांना त्याची माहिती होईल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करू शकतील", असा सल्ला अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
मुख्यमंत्र्यांनीही या सूचनेचे स्वागत करुन सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच सरकारकडून हा विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी अक्षय कुमारने त्याच्या 'टॉयलेट - एक प्रेमकथा' या सिनेमाबद्दलही सांगितलं. त्यामधला एक डायलॉगही त्याने यावेळी सादर केला.
"अगर बिवी पास चाहिए, तो घर में संडास चाहिए" हा डायलॉग सादर करताच, उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
घरात शौचालय असावं म्हणून एका महिलेने घटस्फोट मागितला. त्या महिलेचं उदाहरण देत अक्षय कुमारने त्या महिलेचं कौतुक केलं आणि प्रत्येक पुरुषाला आवाहन केलं की लग्न करायचं असेल तर घरी शौचालय असलंच पाहिजे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement