(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akshay Kumar : बायकॉट 'रक्षा बंधन' ट्रेंडवर अक्षयनं दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'हा चित्रपट देशाच्या अर्थव्यवस्थेला...'
देशाच्या अर्थव्यवस्थेला हा चित्रपट हातभार लावेल, अशी प्रतिक्रिया अक्षय कुमारनं (Akshay Kumar) दिली आहे.
Akshay Kumar On Raksha Bandhan Boycott : बॉलिवूडचा 'खिलाडी' अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या त्याच्या रक्षा बंधन (Raksha Bandhan) या आगमी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं सध्या अक्षय प्रमोशन करत आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी नेटकरी सोशल मीडियावर करत होते. ट्विटरवर BoycottRakshaBandhan हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या सर्व गोष्टींवर अक्षयनं आता रिअॅक्शन दिली आहे.
कोलकाता येथील एका इव्हेंटमध्ये अक्षय कुमारनं रक्षा बंधनला बायकॉट करण्याची मागणी करणाऱ्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हाणाला, 'भारत हा एक स्वतंत्र देश आहे, येथे कोणीही काहीही करु शकते.'
चित्रपट देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतील
अक्षय पुढे म्हणाला, 'रक्षा बंधन आणि लाल सिंह चड्ढा हे चित्रपट देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतील. मी ट्रोलर्सला आणि मीडियाला विनंती करतो की या सर्व गोष्टींच्या मध्ये पडू नका. ' अक्षयच्या या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अक्षय सध्या रक्षा बंधन या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन चाहत्यांची भेट घेतोय. अक्षयसोबत त्याची टीम देखील ट्रॅव्हल करत आहे. अक्षयसोबतच अभिनेत्री भूमि पेडणेकर, सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, दीपिका खन्ना आणि सहजमीन कौर हे कलाकार रक्षा बंधन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केलं आहे. अक्षयच्या या चित्रपटात भरपूर फॅमिली ड्रामा असणार आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
रक्षा बंधन आणि लाल सिंह चड्ढा या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
वाचा इतर बातम्या: