Raksha Bandhan OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर खिलाडी कुमारचा 'रक्षा बंधन' 'झी 5' वर होणार रिलीज
Raksha Bandhan : 'रक्षा बंधन' हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. तर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Raksha Bandhan OTT Release : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
खिलाडी कुमारचा या वर्षात प्रदर्शित होणारा हा तिसरा सिनेमा आहे. अक्षयच्या 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश आले नाही. त्यामुळे अक्षय सध्या 'रक्षा बंधन' सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. पुणे, इंदौर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अक्षय या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.
'रक्षा बंधन' झी 5 वर होणार प्रदर्शित
'रक्षा बंधन' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर काही दिवसांनी 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. 'रक्षा बंधन' सिनेमाने बॉक्स ऑफिस चांगला गल्ला जमवावा यासाठी अक्षय अनेक प्रयत्न करताना दिसत आहे.
View this post on Instagram
भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत
'रक्षा बंधन' या सिनेमात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. याआधी दोघे 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमात दिसून आले होते. त्यामुळे प्रेक्षक आता दोघांना 'रक्षा बंधन' सिनेमात पाहण्यास उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या























