Rakshabandhan Vs LSC : 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'च्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात; बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर
Rakshabandhan Vs LSC : 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Rakshabandhan Vs LSC : सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि आमिर खान (Aamir Khan) चर्चेत आहेत. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि अक्षयचा 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमांच्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात झाली आहे.
'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' आमने-सामने
'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. आता या सिनेमांच्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात झाली आहे. मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' आणि खिलाडी कुमारचा 'रक्षा बंधन' सिनेमा रिलीज होण्याआधीच चर्चेत आला आहे. या सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. अक्षयच्या लाल सिंह चड्ढाने अॅडव्हांस बुकिंगच्या पहिल्या दिवशी 65 लाखांची कमाई केली आहे.
'लाल सिंह चड्ढा'ने 'रक्षा बंधन'ला टाकलं मागे
'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाने खिलाडी कुमारच्या 'रक्षा बंधन'ला मागे टाकलं आहे. 'लाल सिंह चड्ढा'ने अॅडव्हांस बुकिंगच्या पहिल्या दिवशी 65 लाखांची कमाई केली आहे. तर 'रक्षा बंधन'ने 47 लाखांची कमाई केली आहे. 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आल्यानंतर कोणता सिनेमा चांगला गल्ला जमवतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'आदिपुरुष'ची रिलीज डेट बदलली
'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' बॉक्सऑफिसवर टक्कर होणार आहे. स्क्रीन्ससाठीदेखील दोन्ही सिनेमांत टक्कर होऊ शकते. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांचे कलेक्शन कमी करताना दिसणार आहेत. 'प्रभास' आणि 'सैफ अली खान'चा 'आदिपुरुष' सिनेमादेखील 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या