एक्स्प्लोर
'ढिशूम'मध्ये अक्षय कुमारचा कॅमियो, डॅशिंग लूक समोर
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या डॅशिंग लूकने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांच्या आगामी 'ढिशूम' सिनेमात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्टलूक रिलीज झाला असून त्यात तो अतिशय कूल दिसत आहे.
जेट-स्कीवर स्वार आणि मोठे केस असा फोटो स्वत: अक्षयने ट्विटरवर पोस्ट केला आहे. "कॅमियो रोलचं शूटिंग. माझा मित्र साजिद, जॉन, वरुण, जॅकीला माझ्याकडून खूप शुभेच्छा, ढिशूम," असं या फोटोसह लिहिलं आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/757736294403407873
सिनेमाचे कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. निर्माता-दिग्दर्शकांना सिनेमात नवं काहीतरी करायचं होतं. म्हणूनच त्यांनी अक्षयला कॅमियो रोलमध्ये आणलं. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे अक्षय आणि जॉन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.
अनिलच्या स्टंटबाजीची नक्कल नको, जॉनचं आवाहन
याशिवाय लवकरच अक्षय कुमारचा 'रुस्तम' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अक्षयने नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अक्षयसह एलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement