एक्स्प्लोर
Advertisement
रोबो 2 साठी अक्षयकुमारला रजनीपेक्षा जास्त मानधन!
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारची गाडी सध्या तेजीत आहे. एअरलिफ्ट, हाऊसफुल्ल 3 सारखे बॉक्स ऑफिसवर कमाल करणारे चित्रपट केल्यानंतर अक्षयचा भाव वधारला आहे. त्याचं टॉलिवूड पदार्पण असलेल्या रोबो 2 चं मानधन दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतपेक्षा अधिक असल्याचं वृत्त आहे.
रोबो 2.0 मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी अक्षयसाठी जास्त रक्कम मोजली जात असल्याचं खात्रीलायक सुत्रांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे अक्षयने दाखवलेली तत्परता याचं कारण आहे.
ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सलमान, हृतिक यांना विचारणा झाली होती. मात्र त्यांच्यासोबत बोलणी फिस्कटल्याने ही ऑफर अक्षयला देण्यात आली. निर्मात्यांच्या मागणीनुसार अक्षयने तात्काळ शूटिंगला तारखा दिल्या आणि इतर मागण्यांनाही होकार दर्शवला. त्यामुळेच अक्षयची मागणीही मान्य करण्यात आली.
अक्षयकुमार सध्या रुस्तम चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. एलियना डिक्रुझ आणि अक्षयची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 12 ऑगस्ट 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
करमणूक
Advertisement