एक्स्प्लोर

Selfiee Release Date: अक्षय कुमार, इमरान हाश्मीच्या ‘सेल्फी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Selfiee Release Date: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी अभिनित ‘सेल्फी’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Selfiee Release Date: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. अक्षय कुमारने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या आगामी 'सेल्फी' (Selfiee) चित्रपटाची घोषणा केली होती. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. राज मेहता दिग्दर्शित 'सेल्फी' (Selfiee) हा साऊथचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सेल्फी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, 'अक्षय कुमार, इमरान हाश्मी स्टारर 'सेल्फी' 24 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकृत रिमेक आहे.’ याचाच अर्थ अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या या कॉमेडी ड्रामा चित्रपटासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पाहा पोस्ट :

‘सेल्फी’ हा राज मेहता दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, इमरान हाश्मी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो अक्षय कुमारचा खूप मोठा चाहता असणार आहे. अक्षय आणि इमरानसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात नुसरत भरुचा इमरानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाबद्दल सांगायचे तर, यात पृथ्वीराज आणि सूरज वेंजरामोधू मुख्य भूमिकेत दिसले होते. आता त्याच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी धमाल करताना दिसणार आहेत. राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

कलाकारही व्यस्त!

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात दिसणार आहे. जो 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो चार बहिणी असलेल्या एका मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, इमरान हाश्मी लवकरच सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. जो पुढील वर्षी 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget