Akshay Kumar : अक्षय कुमारमुळे 'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप; आदित्य चोप्राने केले गंभीर आरोप
Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला होता. पण हा सिनेमा फ्लॉप होण्यामागे अक्षय कुमार असल्याचे म्हटले जात आहे.
Samarat Prithviraj Failure : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला आहे. अक्षय कुमारमुळेच हा सिनेमा फ्लॉप झाल्याचा आरोप आता चंद्रप्रकाश द्विवेदी आणि आदित्य चोप्राने केला आहे. 200 कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 69 कोटींची कमाई केली आहे.
'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमासाठी अक्षय कुमार स्वत:चीच मनमानी करत होता. अक्षयने सिनेमात चांगले काम केले नसल्याने सोशल मीडियावरदेखील नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 'सम्राट पृथ्वीराज'ची भूमिका साकारायला अक्षयने कमी मेहनत घेल्याने त्याचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. या सिनेमासाठी अक्षयने 60 कोटींपेक्षा अधिक मानधन घेतलं आहे. याचा परिणाम सिनेमाच्या बजेटवरदेखील पडला.
'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' झाला फ्लॉप
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण कंगनाचा 'धाकड' मात्र फ्लॉप ठरला आहे. कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. अद्याप चाहत्यांची ही क्रेझ कमी झालेली नाही. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.
'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमासाठी अक्षय कुमारने 60 कोटींचे मानधन घेतले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या