एक्स्प्लोर
अक्षयचे 2017 मध्येही चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला
नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे यावर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी म्हणजे 2017 मध्येही चार सिनेमे रिलीज होणार आहेत. अक्षयच्या 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या सिनेमाची शूटिंग नुकतीच सुरु झाली आहे.
पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 10 फेब्रुवारीला अक्षय 'जॉली एलएलबी 2' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांतचा सुपरहिट सिनेमा रोबोटचा सिक्वेल 'रोबोट 2' रिलीज होणार आहे.
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला 'रुस्तम' रिलीज झाल्यानंतर अक्षयने लगेचच पुढच्या स्वातंत्र्यदिनाला दिग्दर्शक नीरज पांडेसोबतचा 'क्रॅक' सिनेमा येणार असल्याचं जाहीर केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित 'टॉयलेट-एक प्रेम कथा' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला 2017 मध्येच येणार आहे. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर अक्षयसोबत दिसणार आहे.
अक्षय कुमारचे दरवर्षी कमीत कमी चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावर्षी अक्षयचे एअरलिफ्ट, हाऊसफुल 3 आणि रुस्तम हे सिनेमे रिलीज झाले. तर 2015 मध्ये बेबी, गब्बर इज बॅक, ब्रदर्स, सिंग इज ब्लिंग हे चार सिनेमे रिलीज झाले होते.
संबंधित बातमी : अक्षयच्या नव्या सिनेमाची शूटिंग सुरु, सेटवरील फोटो शेअर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement