The Wild With Bear Grylls Teaser Out : जंगल अन् अॅडव्हेंचर्स; बेअर ग्रील्सचं चॅलेंज स्वीकारणार बॉलिवूडचा 'सिंघम'
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमारनंतर आता ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण हजेरी लावणार आहे.

Ajay Devgn's Into The Wild With Bear Grylls teaser out: जंगलामधून अथवा बेटावरून कोणत्याही यंत्राचा वापर न करता बाहेर पडून दाखवणारा बेअर ग्रील्स तुम्हाला माहित असेल. त्याच्या ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अनेक प्रसिद्ध व्यक्तिंनी बेअर ग्रील्सच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमारनंतर आता ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण हजेरी लावणार आहे. नुकताच डिस्कव्हरी प्लसने सोशल मीडियावर अजय देवगणच्या एपिसोडच्या टीझरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजय देवगण वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे.
View this post on Instagram
टीझरमध्ये अजय देवगणचा भन्नाट डायलॉग
टीझरमध्ये अजय देवगण म्हणतो, 'हा मंच केवळ साहसी लोकांचा आहे. हा काही खेळ नाही.' डिस्कव्हरी प्लसने अजयचा हा व्हिडीओ शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'जंगलात राहणे सोपे नसते. बॉलिवूडचा शेर अर्थात अजय देवगणने अल्टिमेट सरवायव्हल चॅलेंज स्विकारले आहे. बघूयात तो हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का?' बेअर ग्रील्ससोबत अजय देवगणने काही दिवांपूर्वी मालदीव येथे या एपिसोडचे शूट पूर्ण केले आहे. आता बेअर ग्रील्स आणि अजयच्या या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अजयच्या या भागाचा प्रीमिअर डिस्कव्हरी प्लस अॅपवर २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच हा भाग 25 ऑक्टोबर रोजी हा डिस्कव्हरीवर प्रदर्शित होईल. अजय देवगणनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल देखील बेअर ग्रील्सच्या या शोमध्ये सहभागी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अजय देवगमचा भूज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच तो मैदान आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
























