(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood Actor : बॉलिवूडचा 'हा' अभिनेता शिवभक्तीत तल्लीन; नेहमी सोबत ठेवतो रुद्राक्ष; घराचं नावंही ठेवलंय 'शिवशक्ती'
Bollywood Star Lord Shiva Devotee : हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार शंकराचे भक्त आहेत. पण बॉलिवूडचा एक अभिनेता मात्र शिवभक्तीत चांगलाच तल्लीन झाला आहे. तो नेहमी सोबत रुद्राक्ष वेठतो तसेच त्याने आपल्या घराचं नावदेखील भोलेनाथवर ठेवलं आहे.
Bollywood Star Lord Shiva Devetee : बॉलिवूड (Bollywood) कलाकार नेहमीच त्यांच्या सिनेमांमुळे, वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा वक्तव्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने आपल्या चित्रपटातील पात्रांमध्येही शिवभक्तीचे (Shiva) रंग दाखवले आहेत. रील लाईफ नव्हे तर खऱ्या आयुष्यातही हा अभिनेता कट्टर शिवभक्त आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार शिवभक्त आहेत. पण बॉलिवूडचा एक अभिनेता मात्र शिवभक्तीत चांगलाच तल्लीन झाला आहे. तो नेहमी सोबत रुद्राक्ष वेठतो तसेच त्याने आपल्या घराचं नावदेखील भोलेनाथवर ठेवलं आहे.
छातीवर आहे शंकराचा टॅटू
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) शंकराचा मोठा भक्त आहे. त्याने आपल्या छातीवरही शंकराचा टॅटू काढला आहे. अजयच्या अनेक सिनेमांची नावेही शंकराच्या नावावर आहेत. अजय देवगन अनेकदा सोशल मीडियावर भोलेनाथचे फोटो शेअर करत असतो.
घराचं नावंही ठेवलंय 'शिवशक्ती'
अजय देवगन शंकराचा मोठा भक्त असून त्याने आपल्या घराचं नावदेखील 'शिवशक्ति' असे ठेवले आहे. मुंबईतील जुहू भागात अजय देवगन आणि काजोलचा बंगला आहे. या बंगल्याचं नाव भोलेनाथवर ठेवण्यात आलं आहे. सुपरस्टारच्या या बंगल्याची किंमत 60 कोटींच्या आसपास आहे.
अजयच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या... (Ajay Devgn Upcoming Movies)
अजय देवगनचा 'शैतान' (Shaitaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजयचा बहुप्रतिक्षीत 'मैदान' (Maidan) हा क्रीडाविषयक चित्रपट येत्या 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमातही अजयची झलक पाहायला मिळणार आहे.
अजय देवगनने आजवर 100 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं आहे. सिनेमात काम करण्यासोबत त्याने निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 'फूल और काटे' या सिनेमाच्या माध्यमातून अजयने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दिलवाले, जिगर, दिल जले, सुहाग, गोलमाल, सिंघम, सन ऑफ सरदार, तान्हाजी असे अजयचे अनेक चित्रपट गाजले आहेत. 'यू मी और हम' या चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. अजय देवगनचं खरं नाव विशाल देवगण आहे. पण सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं. अजय देवगनचं नाव करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि तब्बू या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अजय 1999 मध्ये काजोलसोबत लग्नबंधनात अडकला. आजवर पुरस्कारांवर अजयने नाव कोरलं आहे.
संबंधित बातम्या