एक्स्प्लोर
लोकांना काय आवडतं याचा विचार आम्ही करत नाही - अजय-अतुल
मराठीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्यांचे अनुभव सांगितले.
मुंबई : लोकांना काय आवडतं याचा विचार आम्ही करत नाही, आम्हाला जे मनापासून आवडतं तेच आम्ही करतो, असे विधान मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी केले आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी माझा कट्ट्यावर आली. यावेळी त्यांनी आपले अनुभव सांगितले. "आम्ही लोकांना काय आवडतं याचा विचार करत नाही, तर आम्हाला जे मनापासून आवडतं तेच आम्ही करतो. कारण, जे आपण मनापासून करतो ते सर्वांनाच आवडतं असा आमचा अनुभव आहे. जोपर्यंत एखादी गोष्टी आम्हाला मनापासून आवडत नाही. जोपर्यंत आमच्या स्वतःसाठी वाह निघत तोपर्यंत आम्ही काम करतो", असेही त्यांनी सांगितले. कारण, खूप विचार करुन एखादी गोष्टी केली तर त्यात उत्स्फुर्तता राहत नसल्याचे अजय-अतुल म्हणाले.
हेही वाचा - अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग, फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा, ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप
आम्हाला आवडतं ते लोकांना आवडतं याचा आनंद वाटतो -
आम्ही जे मनापासून करतो, आम्हाला जे आवडतं, तेच लोकांनाही आवडतं याचा आनंद वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही गाणं करताना त्या कामाशी प्रामाणिक असतो. चित्रपटाशी एकरुप होतो. त्यामुळेच आमच्याकडून उत्तम-उत्तम गाणी होत असतील. आई-वडील आणि महाराष्ट्रातील लोकांमुळे इतपर्यंत पोहचलो असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Good News Movie Review : खरंच गुड न्यूज!
फोर्ब्स इंडियाच्या यादीत मानाचं स्थान -
फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सच्या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलची जोडीला या यादीत स्थान मिळालं आहे. ही जोडी 22 व्या क्रमांकावर आहे. कमाई आणि लोकप्रियतेच्या जोरावर अजय-अतुलच्या जोडीने हे स्थान मिळवलं आहे. फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते.
हेही वाचा - मराठमोळी 'अजय-अतुल' नीय जोडी फोर्ब्सच्या यादीत !
Senior citizen Review I ज्येष्ठांच्या सुरक्षेवर भाष्य करणारा 'सिनिअर सिटीझन' I एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement