Aishwarya Gets Married : ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
Aishwarya Gets Married : नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दिग्दर्शक मणीरत्नम यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
Aishwarya Gets Married : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोडपी विवाहबंधनात अडकत आहेत. अनेक महिने, वर्ष डेट केल्यानंतर काही सेलिब्रेटींनी विवाहाच्या घट्ट नात्यात अडकण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही लगीनघाई सुरू आहे. तामिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर (Shankar) यांची मुलगी ऐश्वर्या शंकर (Aishwarya Shankar) ही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) , दिग्दर्शक मणीरत्नम (Maniratnam) यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
सोशल मीडिया मध्ये शेअर होत असलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि तरुणची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. काही महिन्यापूर्वीच ऐश्वर्याचा तरुण कार्तिकसोबत साखरपुडा पार पाडला होता. त्यानंतर एका साध्या समारंभात ऐश्वर्या-कार्तिकचा विवाह सोहळा पार पडला.
जोडप्याचा असा होता लूक
ऐश्वर्याने ही रेड कलरच्या आउटफिटमध्ये दिसून आली. तिने दागिने आणि न्यूड मेकअपसह आपला लूक कंप्लीट केला. तर, नवरदेव तरुणने गोल्डन कलरच्या धोतर-कुर्ता परिधान केला होता.
View this post on Instagram
ऐश्वर्या ही दिग्दर्शक एस. शंकर यांची ज्येष्ठ कन्या असून ती डॉक्टर आहे. ऐश्वर्याचा हा दुसरा विवाह असून तिचा पहिला विवाह हा क्रिकेटपटू दामोदरन रोहित सोबत झाला होता. एका 16 वर्षीय मुलीने क्रिकेट प्रशिक्षक थमराय कन्नन यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रोहितचेही नाव समोर आल्याने तो वादात अडकला होता. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.
एस. शंकर यांचे आगामी चित्रपट
दिग्दर्शक शंकर यांनी 'इंडियन', 'बॉईज', 'शिवाजी द बॉस', 'आय', '2.0' (रोबोटचा सिक्वेल) आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत वेगळे विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. एस. शंकर सध्या कमल हसन यांच्यासोबत 'इंडियन 2' या चित्रपटावर काम करत आहेत.