ऐश्वर्या रायने नावामागचं 'बच्चन' काढून टाकलं? डिवोर्सच्या चर्चांनंतर Video viral
Aishwarya Rai: या फोरमच्या व्हिडिओत ऐश्वर्याचं जे नाव झळकलं त्यात बच्चन आडनाव न दिसल्यानं सोशल मीडियावर पुन्हा गॉसिप सुरु झालं आहे.

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा संपायचं काही नाव घेत नसल्याचं दिसतंय. घटस्फोटावरून उठलेल्या अफवांच्या आगीत आता एका दुबईतील कार्यक्रमातील ऐर्श्वयाच्या viral videoनं तेल ओतलं आहे. ऐश्वर्या रायनं दुबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. ऐश्वर्यानं या कार्यक्रमात तिचं नाव ऐश्वर्या राय असं नाव वापरल्याचं दिसलं. दुबईच्या जागतिक महिला फोरममध्ये ती महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना दिसली.तिच्या भाषणानं जगभरातील महिलांचं आणि चाहत्यांचं तिनं लक्ष वेधून घेतलं. या फोरमच्या व्हिडिओत ग्राफीकमध्ये ऐश्वर्याचं जे नाव झळकलं त्यात बच्चन आडनाव न दिसल्यानं सोशल मीडियावर पुन्हा गॉसिप सुरु झालं आहे.
दुबईच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल
दुबईच्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याच्या भाषणाचा एक व्हिडिओ गुरुवारी reddit वर शेअर करण्यात आला होता. यात तिला 'ऐश्वर्या राय- इंटरनॅशनल स्टार' असा उल्लेख ग्राफीक्सवर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या महिलांच्या सशक्तीकरणावर बोलत आहे. स्टेजवर येत इथे येणं तिनं आंतरराष्ट्रीय वूमन्स फोरमला हात जोडून भारतीय पद्धतीनं नमस्कार करून भाषणाला सुरुवात केली. या फोरममध्ये सहभागी होणं हा सन्मान मोठा असल्याचं सांगत ऐश्वर्यानं विविधता असलेल्या भागांमधून आलेल्या महिलांनी एकत्र येत महिलांच्या सक्षमीकरणावर आणि जगभरातील महिलांना समान संधी मिळवून देण्यावर काम करूया असं ती या कार्यक्रमात म्हणाली. पण हा व्हिडिओ व्हायरल झाला तो वेगळ्याच कारणासाठी. या व्हिडिओच्या ग्राफीकवर ऐश्वर्यानं केवळ ऐश्वर्या राय असं नाव वापरल्यानं नेटकऱ्यांनी बच्चन नाव काढून टाकलं का? असा सवाल करत चर्चा सुरु केली. काहींनी तिच्या या व्हिडिओला चांगला प्रतिसादही दिलाय. भारताची शान, वाह ऐश्वर्या, अशा कमेंटसही केल्या आहेत.
View this post on Instagram
ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या
बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक (Abhishekh Bachchan) सध्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसत नाहीत. अशातच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या नात्याचं काय झालं? याबाबत इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
