ऐश्वर्या रायचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, अभिषेक बच्चनसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना नापसंत; कोट्यवधींचं नुकसान झाल्यावर निर्माता 12 वर्षे गायब
Aishwarya Rai Biggest Flop Movie : ऐश्वर्या रायच्या करियरमधील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटात तिचा कोस्टार अभिषेक बच्चन होता. कोट्यवधींचं नुकसान झाल्याने निर्माता 12 वर्षे गायब होता.
Abhishek Bachchan Aishwarya Rai Flop Movie : विश्वसुंदरी आणि बॉलवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे भारतासह जगभरात लाखो चाहते आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने तिच्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तर, तिचे काही चित्रपट फ्लॉपही ठरले होतं. यातील एक चित्रपट ऐश्वर्या रायच्या करियरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि तिच्या करियरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.
ऐश्वर्या रायचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट
बॉलिवूडमध्ये रिमेकचे बनण्याचा ट्रेंड नवा नसून वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांचे रिमेक बनले आहेत. अनेक साऊथ चित्रपटांचे रिमेक बनले आहेत. इतकंच काय तर अने बॉलिवूड चित्रपटांचेही पुन्हा हिंदी रिमेक बनले आहेत. या यादीतील पहिला क्रमांक म्हणजे 'देवदास' चित्रपट. दिलीप कुमार यांच्या देवदास चित्रपटाचा शाहरुख खानला घेऊन रिमेक करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांना आणि स्टार्सला प्रेक्षकांनी डोक्यावर उचललं. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं.
ऐश्वर्या - अभिषेकचा फ्लॉप चित्रपट
याशिवाय, आणखी एक चित्रपट आहे ज्याचा रिमेक झाला, पण पहिल्या चित्रपटाप्रमाणे दुसरा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय मूख्य भूमिकेमध्ये होती, तर अभिषेक बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत होता. या चित्रपटाकडून निर्मात्यांची खूप अपेक्षा होती, मात्र तरीही हा चित्रपट अयशस्वी ठरला. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा रोमान्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही..
पहिला चित्रपट हिट, दुसरा फ्लॉप
कवी आणि लेखक मिर्झा हादी रुसवा यांनी 1899 मध्ये लिहिलेली 'उमराव जान अदा' ही उर्दू साहित्यातील उत्कृष्ट कादंबरी मानली जाते. याची कथा एका मुलीभोवती फिरते, जिला लहानपणी वेश्यालयात विकलं जातं आणि ती पुढे लखनौच्या सर्वात प्रसिद्ध वेश्यांपैकी एक बनते. या कादंबरीचं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये रुपांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर भारतातील दोन चित्रपट बनवण्यात आले.
'उमराव जान अदा' कादंबरीवर आधारित एका चित्रपटामध्ये रेखा आणि ऐश्वर्या राय दुसऱ्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. 1981 मध्ये रेखाचा उमराव जान चित्रपट आला, जो हिट ठरला. त्यानंतर 2006 मध्ये जेपी दत्ताने ऐश्वर्या रायसोबत 'उमराव जान' बनवला होता. यामध्ये अभिषेक बच्चन, शबाना आझमी, सुनील शेट्टी, दिव्या दत्ता आणि कुलभूषण खरबंदा यांसारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते.
ऐश्वर्यापूर्वी प्रियांकाला चित्रपटाची ऑफर
ऐश्वर्या रायचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. 15 कोटींमध्ये बनलेला 'उमराव जान' ऐश्वर्या रायचा सर्वात मोठा फ्लॉप ठरला. बॉक्स ऑफिस इंडिया पोर्टलनुसार, या चित्रपटाने भारतात फक्त 7.42 कोटी रुपयांची कमाई केली. 'उमराव जान' रिलीज होण्यापूर्वी जेपी दत्ता यांनी खुलासा केला होता की, या चित्रपटासाठी ऐश्वर्या नव्हे तर प्रियांका चोप्रा ही त्यांची पहिली पसंती होती.
कोट्यवधींचं नुकसान झाल्यावर निर्माता 12 वर्षे गायब
2005 मध्ये पीटीआयशी बोलताना दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी सांगितलं होतं की, 'मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की, मला निर्णय घ्यावा लागला. मला प्रियंकासोबत काम करायचं होतं. मी तिला उमराव जॉनच्या रुपात पाहिलं होतं, पण आम्ही शेवटच्या टप्प्यात होतो. अखेरीस ऐश्वर्याला कास्ट करण्यात आलं'.
या चित्रपटामुळे झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानामुळे जेपी दत्ता 12 वर्ष इंडस्ट्रीतून गायब होते. जेपी दत्ता यांनी 1997 मध्ये बॉर्डर चित्रपट बनवला होता, त्यानंतर त्यांनी उमराव जान चित्रपटाची निर्मिती केली. पण, यामुळे झालेल्या नुकसानामुळे त्यांचा पलटन चित्रपट बारगळला. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये वॉर चित्रपटाची निर्मिती केली, आता ते वॉर 2 मध्ये व्यस्त आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :