Anushka Sharma : बिग बींपाठोपाठ अनुष्का शर्माची बाईक राईड; हेल्मेट न घातल्याने नेटकरी संतापले
Anushka Sharma : अनुष्का शर्माचा बाईकस्वारी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Anushka Sharma Bike Ride Video : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अनुष्का गेल्या काही दिवसांपूर्वी पतीसोबत डिनर डेटवर जाताना स्पॉट झाली होती. आता अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का बाईकस्वारी करताना दिसत आहे.
अनुष्का शर्माची बाईकस्वारी (Anushka Sharma Bike Ride)
विराट कोहलीची पत्नी असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या सिनेमांसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बॉर्डीगार्डसोबत बाईकस्वारी करताना दिसत आहे.
अनुष्का शर्मा एका वेगळ्या लूकमध्ये या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनुष्काआधी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बाईक राईड करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये ते एका अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसलेले दिसून आले होते.
View this post on Instagram
अनुष्काने हेल्मेट न घातल्याने नेटकरी संतापले
अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र संतापले आहेत. अनुष्काने आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातलेलं नाही, अनुष्काचा लूक पालिकेचा गणवेश वाटतोय, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनुष्काने आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट न घातल्याने नेटकरी मात्र संतापले आहेत.
अनुष्का शर्माच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Anushka Sharma Upcoming Movies)
अनुष्का शर्मा 2017 साली विराट कोहलीसोबत लग्नबंधनात अडकली. वामिकाच्या जन्मानंतर तिने गेली काही वर्ष अनुष्का अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता. अनुष्काचे चाहते तिच्या सिनेमांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्का ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनुष्काला इन्स्टाग्रामवर 63 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. अनुष्काचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या