Amitabh Bachchan: बिग बींची बाईक राईड; अनोळखी व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हणले, 'धन्यवाद मित्रा...'
नुकताच अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हार्ड वर्किंग अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी कोणत्याही चित्रपट किंवा कार्यक्रमाच्या सेटवर वेळेवर पोहचत असतात. नुकताच अमिताभ यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन हे एका अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसलेले दिसत आहेत. बिग बींना त्या व्यक्तीनं लिफ्ट दिली. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्या अनोळखी व्यक्तीचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट
बिग बींनी सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे आणि त्या बाईकच्या बॅक सिटवर अमिताभ बच्चन बसलेले दिसत आहेत. या फोटोला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं, 'या राइडबद्दल धन्यवाद मित्रा.. मी तुला ओळखत नाही.पण तू मला कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलेस. जलद आणि ट्रॅफिक जाम टाळून मला कामाच्या ठिकाणी तू पोहोचवले आहेस.. कॅप, शॉर्ट आणि पिवळा टी-शर्ट असा लूक असलेल्या या व्यक्तीचे मी आभार मानतो.'
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या बिग बी नाग अश्विन यांच्या 'प्रोजेक्ट के' (Project K) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर ते जखमी देखील झाले होते. अलीकडेच बिग बींनी रिभू दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित 'सेक्शन 84' चित्रपट देखील साइन केला आहे. यामध्ये डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर हे कलाकार देखील दिसणार आहेत.
केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :