(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adipurush Box Office Collection : डिस्काऊंटनंतरही 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर आपटला; रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त 5.50 कोटींची केली कमाई
Adipurush : प्रभास आणि कृती सेननच्या 'आदिपुरुष' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर खेळ खल्लास झाला आहे.
Adipurush Box Office Collection Day 7 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रिलीजआधी या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. पण रिलीजनंतर या सिनेमावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. 'आदिपुरुष'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली. पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे.
'आदिपुरुष' सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा चालावा यासाठी खास ऑफर ठेवली होती. प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत या सिनेमातील संवाद बदलण्यात आले आहेत. तसेच 22 आणि 23 जून रोजी 'आदिपुरुष' सिनेमाच्या तिकीटांची किंमत 150 रुपये ठेवण्यात आली होती. पण या ऑफरचा सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेली नाही.
'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Adipurush Box Office Collection)
'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86 कोटींची कमाई केली होती. पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट व्हायला लागली. दुसरा दिवस 65.25 कोटी, तिसरा दिवस 29.03 कोटी, तिसरा दिवस 29.03 कोटी, चौथा दिवस 16 कोटी, पाचवा दिवस 10.7 कोटी, सहावा दिवस 7.25 कोटी आणि सातव्या दिवशी 5.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 260.55 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 86 कोटी
- दुसरा दिवस : 65.25 कोटी
- तिसरा दिवस : 29.03 कोटी
- चौथा दिवस : 16 कोटी
- पाचवा दिवस : 10.7 कोटी
- सहावा दिवस : 7.25 कोटी
- सातवा दिवस : 5.50 कोटी
- एकूण कमाई : 260.55
'आदिपुरुष'ने जगभरात पार केला 400 कोटींचा टप्पा
'आदिपुरुष' या सिनेमाने जगभरात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत जगभरात 410 कोटींची कमाई केली होती. आजही हा सिनेमा 150 रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
'आदिपुरुष' सिनेमातील काही संवादांमुळे आणि दृश्यांमुळे या सिनेमावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. हनुमानाचे संवाद, रावणाचा लूक, रावणाची लंका, इंद्रजीतचा लूक, रामाचा-सीतेचा लूकवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच या सिनेमातील व्हीएफएक्सदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले नाहीत.
संबंधित बातम्या