Adipurush Box Office: 'आदिपुरुष'च्या कमाईत घसरण; सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली एवढी कमाई
सहा दिवसात आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
Adipurush Box Office: प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. सहा दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
रविवारी (18 जुलै) या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर 69.1 कोटींचे कलेक्शन केले. तर सोमवारी (19 जुलै) या चित्रपटानं 16 कोटींची कमाई केली. तसेच मंगळवारी (20 जुलै) चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी घट झाली. मंगळवारी (20 जुलै) या चित्रपटानं 10.70 कोटींची कमाई केली. आता रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' चित्रपटाच्या कमाईत बुधवारी (21 जुलै) मोठी घट झाली आहे. बुधवारी या चित्रपटानं 7.50 कोटींची कमाई केली आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं सहा दिवसात 255.30 कोटींची एकूण कमाई केली आहे.
आदिपुरुष चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर सहा दिवसांत 410 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
टी-सीरिजनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुष चित्रपटाचं तिकीट दर 150 रुपये करण्यात आसल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. 22 आणि 23 जून रोजी आदिपुरुष हा चित्रपटानं प्रेक्षकांना 150 रुपयात बघायला मिळणार आहे.
Experience the epic tale in 3D on the big screen at the most affordable price! Tickets starting at Rs150/-* ✨
— T-Series (@TSeries) June 21, 2023
Offer not valid in Andhra Pradesh, Telangana, Kerala and Tamil Nadu
3D Glass Charges as applicable.
Book your tickets on:https://t.co/0gHImE23yj#Adipurush now in… pic.twitter.com/UU5PiNcEbt
आदिपुरुष चित्रपटाच्या शोदरम्यान चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागेनं बजरंगबलींची भूमिका साकारली आहे. आदिपुरुष चित्रपटातील बजरंगबलींच्या एका डायलॉगला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
600 कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रभासनं या चित्रपटात प्रभू श्रीरामची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री कृती सेनननं आदिपुरुष या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या